‘स्टाइल’ फेम अभिनेता साहिल खानबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. काही दिवसापुर्वी महादेव बेटिंग ॲप (Mahadev Betting App case) प्रकरणी त्याच नाव समोर आलं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या एसआयटीकडून त्याची चौकशीही करण्यात आली. आता या प्रकरणी त्याला ताब्यात (Actor Sahil Khan arrested ) घेतल्याची माहिती समोर येत आहे. साहिल खान द लायन बुक ॲप नावाच्या बेटिंग ॲपशी जोडला गेला होता, जो महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचा देखील भाग आहे. साहीलने जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती, मात्र त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.
गेल्या वर्षभरापासून महादेव बेटिंग ॲप प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणात अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत. आता या यादीत साहिल खानच्या नावाचाही समावेश झाला आहे. साहीलला छत्तीसगडमधून ताब्यात घेण्यात आले असून तेथून त्याला मुंबईत आणले जात आहे. तो Lotus Book 24/7 नावाच्या बेटिंग ॲप वेबसाइटचा भागीदार आहे, जो महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचा भाग आहे.अशी माहिती पोलिसांनी दिली.
साहिलने लायन बुक ॲपचा प्रचार आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा आरोप आहे. लायन बुकची जाहिरात केल्यानंतर त्यांनी भागीदार म्हणून Lotus Book 24/7 ॲप लाँच केले. ॲपच्या प्रचारासाठी साहिलने आपला प्रभाव वापरला. तो सेलिब्रिटींना आमंत्रित करायचा आणि भव्य पार्ट्यांचे आयोजन करायचा. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. लवकरच पोलीस प्रकरणातून आणखी अनेक मोठे पैलू समोर येऊ शकतात.
अभिनेता साहिल खान आता बॅालिवूडमध्ये अॅक्टिव्ह नाही. त्याने एक्सक्यूज मी आणि स्टाईल सारख्या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. मात्र, तो मनोरंजन क्षेत्रात हवा तसा प्रभाव पाडू शकला नाही. यानंतर त्यांने इंडस्ट्री सोडली. यानंतर त्याचा फिटनेस एक्सपर्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. साहिल डिव्हाईन न्यूट्रिशन नावाची कंपनी चालवतो, जी फिटनेस सप्लिमेंट्स विकते. साहिल म्हणाला की तो टॅलेंटेड आहे, पण त्याच्या टॅलेंटचा चित्रपटांमध्ये योग्य वापर झाला नाही. त्यामुळेच त्यांनी ते क्षेत्र सोडलं.
या वर्षी साहिल खान अचानक चर्चेत आला तो म्हणजे त्याच्या लग्नामुळे. साहिलने 2004 मध्ये इराणमधील अभिनेत्री निगार खानशी लग्न केले होते. पण लग्नाच्या अवघ्या एक वर्षानंतर हे जोडपे एकमेकांपासून वेगळे झाले.या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्याने दुसर लग्न केलं. रशियामधील एका मॅाडेलसोबत त्यांन लग्नगाठ बांधली. त्याची पत्नी त्याच्याैपेक्षा 26 वर्षांनी लहान आहे. लग्नाबाबत त्याने सांगितले की, मिलेना आल्यानंतर त्याचे आयुष्य बदलले आहे. ती त्याच्यापेक्षा वयाने लहान असली तरी ती खूप हुशार आहे. ती सकारात्मक आहे आणि त्याला आनंदी ठेवते.