(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘सुपर डान्सर चॅप्टर ५’ मध्ये हा आठवडा सुपर क्लासिक ठरणार आहे. ज्या अंतर्गत मनोरंजनाच्या सुवर्णयुगाला मानाचा मुजरा केला जाणार आहे. या विशेष भागात आदितीने पुन्हा एकदा आपल्या नृत्याने सर्वांची मने जिंकली आहेत.
आदितीचा प्रवास अधिकच प्रेरणादायी ठरतो आहे, कारण या आठवड्यात तिला खास पाठिंबा मिळाला आहे, तोही थेट राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि ‘जोगवा’ चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेले मराठी सिनेअभिनेते उपेंद्र लिमये यांच्याकडून. उपेंद्र लिमये यांनी खास मेसेज देत तिला पाठिंबा दिला आहे.
जेव्हा द ग्रेट खली त्याच्यापेक्षा उंच 17 वर्षाच्या पोराला भेटतो!
सातारहून पाठवलेल्या या संदेशात उपेंद्र लिमये म्हणतात,
“ही माझी खास शुभेच्छा आहे त्या एकासाठी जिला साताऱ्याने घडवलंय आणि जिला आज संपूर्ण भारत पाहतोय सुपर डान्सर या शोमध्ये. आपल्या साताऱ्याचीच लेक , कमाल, अप्रतिम, सुंदर! तुझा १००% परफॉमन्स देताना प्रत्येकवेळी दिसत आहे. तुला खूप खूप शुभेच्छा. साताराही तुझ्यासोबत आहे, आणि आता संपूर्ण महाराष्ट्रही! ऑल द बेस्ट!”
आपल्या गावाचं नाव उज्वल करणारी आदिती आज महाराष्ट्रभरातील लहानग्यांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. उपेंद्र लिमये यांच्या शब्दांनी तिच्या नृत्ययात्रेला नवे बळ मिळाले आहे.
हॉरर, सस्पेन्सने भरलेली ‘काजळमाया’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
सुपर डान्सर चॅप्टर 5
हा एक भारतीय डान्स रिअॅलिटी शो आहे. जो सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होतो. हा शो भारतीय टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो आहे, जो वेगवेगळ्या डान्स फॉर्म्समधील प्रतिभाशाली बालकलाकारांना एक प्लेटफॉर्म पुरवतो. या शोमध्ये 4-5 वर्षांच्या वयापासून 14 वर्षांपर्यंतच्या मुलांचा सहभाग असतो. या शोमध्ये बालकलाकार विविध प्रकारच्या डान्स फॉर्म्स मध्ये आपली कला सादर करतात.प्रत्येक स्पर्धकाला एक मास्टर किंवा गुरू नियुक्त केला जातो, जो त्याच्या किंवा तिच्या डान्सच्या तयारीसाठी मार्गदर्शन करतो.