(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
द ग्रेट खलीला त्याच्या ताकद आणि उंचीसाठी WWE मध्ये प्रसिद्धी मिळाली आहे. त्याची उंची ७ फूट १ इंच आहे. नुकताच द ग्रेट खलीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो चाहत्यांना थक्क करेल. व्हिडिओमध्ये, एक माणूस खली सोबत चालत आहे, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, खली त्याच्याकडे वर पाहत असल्याचे दिसून येते, या व्हिडिओमध्ये दिसत आहे की तो खलीपेक्षा उंच आहे.
खली म्हणाला ,”माझ्या आयुष्यातील पहिलेच वेळ आहे, जेव्हा मला कुणालाही वरून पाहून बोलावे लागते, आणि तो माझ्यापेक्षा ही जास्त उंच आहे.” यावर त्या व्यक्तीने खलीला उत्तर दिले, ” सर आशीर्वाद तुमचेच आहेत.” खलीपेक्षा उंच असलेल्या माणसाला पाहून चाहते आश्चर्यचकित झाले.
हॉरर, सस्पेन्सने भरलेली ‘काजळमाया’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दोघांनी यावेळी एकमेकांना मिठी देखील मारली आहे. यात दिसणारा व्यक्ती म्हणजे करन सिंग, जो ८ फूट २ इंच उंच आणि अजूनही त्याची उंची वाढत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर, चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका फॅनने लिहिले, “द ग्रेट खलीला भेटला ग्रेटर खली.”अश्या अनेक कमेंट्स चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर दिल्या आहेत.
Exclusive: ‘तरूण प्रोफेसर हे आव्हानच…’ ‘कमळी’चा कबड्डी कोच निखिल दामलेने उलगडला अनुभव
द ग्रेट खली WWE चॅम्पियन कधी बनला?
द ग्रेट खलीने २००६ ते २०१४ पर्यंत WWEमध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीने भारताला विजय मिळवून दिला. कंपनीने त्याला सुरुवातीपासूनच जोरदार प्रोत्साहन दिले. २००७ मध्ये, खलीने स्मॅकडाउनवर २० जणांच्या बॅटल रॉयल जिंकून वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप आपल्या नावावर केली. या विजयाने WWE च्या इतिहासात त्याचे नाव स्थिर केले.त्याने अंडरटेकर, जॉन सेना, रे मिस्टीरियो आणि केन यांच्याशी लढाई केली. 2010 च्या आसपास त्याने काही उत्तम स्टोरीलाइनमध्ये भाग घेतला आणि त्याच्या करिअरमध्ये अजून यश मिळवले.