Anusha Dandekar Jason Shah Breakup He Says Misunderstanding Is Reason For It Nrps
‘गैरसमज’मुळे अनुषा दांडेकरसोबत ब्रेकअप झालं’, अनेक दिवसानंतर जेसन शाहने व्यक्त केली खदखद
हिरामंडी फेम अभिनेता जेसन शाहने अलीकडेच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. एका मीडिया एजन्सीशी बोलताना शाह यांनी अनुषासोबतच्या ब्रेकअपसाठी संवाद न होणं हे कारण सांगितलं आहे.
मुंबई: दिग्दर्शक संजय लीला भन्सालीची हिरामंडी (Heramandi) वेबसिरीज चर्चेत आहेत. यासोबत या वेबसिरीजमधील कलाकारही चर्चेत येत आहेत. यामध्ये ॲलिस्टर कार्टराईटची दमदार भूमिका साकारणारा अभिनेता जेसन शाह (Jason Shah) हा सुद्धा आता चर्चेत आला आहे.
त्यानं नुकताच त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी काही खुलासा केला आहे. व्हीजे आणि अभिनेत्री अनुषा दांडेकर (anusha Dandekar) ही त्याची प्रेयसी होती. तिच्यापासून विभक्त होण्यावरुन तो तो म्हणाला की, ‘मिसकम्युनिकेशन’मुळे आमचं नातं तुटलं.
[read_also content=”राखी सावंतवर होणार शस्त्रक्रिया; रुग्णालयात रडताना दिसल्यावर चाहत्यांनी व्यक्त केली चिंता! https://www.navarashtra.com/latest-news/rakhi-sawant-viral-video-ahead-of-tumor-sugery-nrps-534532.html”]
अनुषा दांडेकरला डेट करत होता जेसन शाह
अनुषा दांडेकरसोबतच्या त्याच्या ब्रेकअपवर बोलताना जेसन म्हणाला की, “ब्रेकअपनंतर माझ्या आयुष्यात एक आध्यात्मिक बदल झाला आहे ज्यामुळे मी अधिक शहाणा झालो आहे. ब्रेकअप हा घाईघाईने करण्यात आलाय. मी खरोखर याबद्दल विचार केला नव्हता नाही. समोरच्या व्यक्तीनं मला खरोखर समजून घेतलं नाही आणि मला असं वाटलं की ती मला तिच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि तसं होणार नाही, बरोबर ना?”
3 वर्षापूर्वी झाले वेगळे
जेसन आणि अनुषा यांनी थोड्या काळासाठी एकमेकांना डेट केले. या जोडप्याने 2021 मध्ये एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. अनुषाचे टीव्ही सेलिब्रिटी करण कुंद्रासोबत अफेअर होते, जो स्प्लिट्सविला आणि रोडीजमध्ये तिच्याबरोबर एकत्र होता आणि या रियालिटी शोसाठी लोकप्रिय आहे. जेसनच्या आधी करणसह अनुषा अनेक वर्ष डेटिंग करत होती.
Web Title: Anusha dandekar jason shah breakup he says misunderstanding is reason for it nrps