फोटो सौजन्य - JioHotstar Reality
बिग बॉस 19 च्या नव्या सीजनला सुरू होऊन पाच दिवस झाले आहेत. आतापर्यंत हे पाच दिवस प्रेक्षकांनी या शोला भरपूर पसंत केले आहे. 29 ऑगस्ट रोजी बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टनची टास्क पार पडला. यामध्ये सीक्रेट रूममध्ये असलेली फरहाणा खान हिला एक शक्ती देण्यात आली होती. फरहाणा खान हिला बिग बॉसने सांगितले होते की तुला जो सदस्य आवडत नाही त्याला तुम्ही कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर करू शकते. यावेळी फरहाना खान हिने बसीर अली याला बाहेर केले आणि बिग बॉसने त्याला संचालक बनवले.
बिग बॉसचा खेळ फारच मनोरंजक होता बिग बॉसने एक चक्र बनवले होते यावर गाणे वाजताच घरातले सदस्य हे त्यावर जातील आणि नाचतील. त्यानंतर त्या चक्राच्या बाहेर काही छोटे बॉक्स बनवले होते त्याला नंबर देण्यात आले होते. यामध्ये गाणे थांबतात घरातील सदस्यांना काही ग्रुप सह दोन किंवा तीनच्या गटाने त्या बॉक्समध्ये जायचे होते. यावेळी अशनूर, कुणीका सदानंद आणि अभिषेक बजाज हे कर्णधार पदासाठी दावेदार आहेत.
Bigg Boss 19 : कोण होणार बिग बाॅस 19 चा पहिला कॅप्टन! झीशान कादरी नॉमिनेशनमध्ये आल्यावर डोकं चालेना
कर्णधार पदाचे दावेदारीसाठी बिग बॉस ने एक वेगळा टास्क डिझाईन केला होता. यामध्ये घरातल्या सदस्यांना कॅप्टनसीच्या दावेदारीसाठी असलेल्या सदस्यांसाठी ठेवण्यात आलेले बोर्ड हे रंगवायचे होते आणि ते तयार करण्यात आलेल्या बॉक्सवर पसरवून ठेवायचे होते. तानिया मित्तल या खेळाची संचालक असते. या खेळात अभिषेक बजाजला कोणीही सपोर्ट करत नाही अशनूर कौर हिला घरातले सदस्य सपोर्ट करतात त्याचबरोबर कोणी का हिला बशीर सपोर्ट करत असतो आणि कुणीकाच्या जागेवर बसेल खेळत असतो. यादरम्यान अभिषेक बजाज आणि बसीर या.
दोघांमध्ये कडाक्याचे भांडण पाहायला मिळाले. यास एपिसोड नंतर सोशल मीडियावर अभिषेक बजाज याला भरभरून प्रेम देण्यात आले आहे. या दोघांमध्ये हे भांडण एवढे वाढले होते की ते दोघे एकमेकांना खेचत होते. आज घरात कॅप्टनसीचा एक टास्क पाहायला मिळाला. कॅप्टनपदाचा दावेदार निवडण्याच्या टास्कनंतर, गौरव खन्ना आणि कुनिका एकमेकांशी बोलत होते, तेव्हा तान्या तिथे आली आणि म्हणाली की तिला कोणालाही चिथावणी द्यायची नाही, पण तिला गौरवला विचारायचे होते की तो का म्हणतोय की तो कुनिकाला कॅप्टन बनवू इच्छित नाही.
The captaincy task has started in Bigg Boss, let’s see who will get the power this time! 🤔
Ashnoor Kaur, Kunickaa Sadanand
Abhishek Bajaj.Watch #BiggBoss19, Mon-Sun at 9 pm on JioHotstar and at 10:30 pm on COLORS TV. pic.twitter.com/SbJKChxY8u
— BiggBoss24x7 (@BB24x7_) August 28, 2025
‘बिग बॉस सीझन १९’ मध्ये, कालच्या भागामध्ये तान्या मित्तल गौरव खन्ना विरुद्ध कुनिका सदानंदच्या मनात विष भरण्याचा प्रयत्न केला. ती कुनिकाला अशा गोष्टी सांगेल की कुनिका आणि गौरवचे नाते आता तुटूले आहे असे दिसून आले आहे. एपिसोडमध्ये, तान्या जाणूनबुजून कुनिकाला सांगते की तिला वाटते की तिचे आणि कुनिकामध्ये सर्वात जवळचे नाते आहे. हे ऐकून कुनिका एक तुच्छ उत्तर देते आणि गौरवला हे ऐकून धक्का बसतो. कुनिका म्हणते की हा तान्याचा गैरसमज आहे. या प्रकरणावर गौरव आणि कुनिका यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण पाहायला मिळाले.