(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिका साकारत आहे. तसेच आता अभिनेत्री विकी कौशलसोबत ‘छावा’ चित्रपटामध्येही दिसणार आहे. त्याचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘सिकंदर’ मध्ये सलमान खानसोबत रश्मिकाला पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. दरम्यान, अशा बातम्या येत आहेत ज्यामुळे चाहत्यांचा उत्साह देखील वाढला आहे. अभिनेत्री श्मिका मंदान्ना आणि सलमान खान या दोघांना ‘सिकंदर’ रिलीजआधीच दुसरा चित्रपट देखील मिळाला आहे. याचबाबत आता आपण जाणून घेणार आहोत.
Vicky Kaushal: विकी कौशल करणार कबीर खानसोबत एकत्र काम? आगामी चित्रपटासाठी केली हातमिळवणी!
सलमानसोबत पुन्हा जोडी बनवणार
एआर मुरुगदास यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सिकंदर’ चित्रपटानंतर, ही अभिनेत्री सलमान खानसोबत एका शीर्षक नसलेल्या चित्रपटात दिसू शकते. फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, दोघांना आणखी एका प्रोजेक्टसाठी एकत्र साइन करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, सलमान आणि रश्मिका अॅटली दिग्दर्शित आगामी चित्रपटात दिसणार असल्याची बातमी समोर आली आहे. ‘सिकंदर’च्या सेटवर या दोघांमध्ये चांगले काम करण्याचे नाते होते आणि ‘पुष्पा २: द रुल’मधील रश्मिकाच्या अभिनयाने अॅटली आणि सलमान दोघांनाही प्रभावित केले, ज्यामुळे तिला एका नवीन प्रोजेक्टसाठी संपर्क साधण्यात आला. या दोघांना पुन्हा एकत्र घेतले. तथापि, अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
सलमान खानच्या कामाची सुरुवात
सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा कतरिना कैफसोबत ‘टायगर ३’ मध्ये दिसला होता. यानंतर आता तो ‘सिकंदर’ मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट २०२५ च्या ईदला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. तसेच या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तसेच हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
शाहिद कपूरचा ‘देवा’ चित्रपट करू शकेल का धमाल? पाहिल्यादिवशी ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केली एवढी कमाई!
रश्मिका मंदानाचे आगामी चित्रपट
रश्मिका मंदानाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची ‘पुष्पा २’ मध्ये अल्लू अर्जुनची पत्नी श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसली होती. आता त्यांच्याकडे सलमानचा ‘सिकंदर’ चित्रपट देखील आहे. तिचा विकी कौशलसोबतचा ‘छावा’ हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, ती धनुष आणि नागार्जुन अक्किनेनी स्टारर ‘कुबेरा’ चित्रपटातही मुख्य भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री अनेक आगामी चित्रपटाचा भाग असणार आहे. आणि चाहत्यांचं भरभरून मनोरंजन करणार आहे.