(फोटो सौजन्य - Instagram)
टीव्ही जगातील सगळ्यात प्रसिद्ध मालिका ‘अनुपमा’ मधून नाव मिळवणारी अभिनेत्री रुपाली गांगुली आता लवकरच नवीन शो होस्ट करताना दिसणार आहे. रंजक आणि हृदयस्पर्शी आशय सादर करण्याची परंपरा कायम ठेवत, रसिक प्रेक्षकांसमोर नेहमीच ताज्या विषयांवरील अर्थपूर्ण कथा सादर करणारी ‘स्टार प्लस’ वाहिनी लवकरच ‘दिल की बातें’ ही नवी मिनी-सीरीज सादर करीत आहे. ‘अनुपमा’ नंतर आता रुपाली पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे.
अनुपमा ऊर्फ रूपाली गांगुलीसह सादर केल्या जाणाऱ्या या मालिकेत मुलांसोबतचा हृदयस्पर्शी संवाद प्रेक्षकांकरता एक आनंद क्षण ठरणार आहे. अनोखी संकल्पना घेऊन आलेल्या या कार्यक्रमाद्वारे रूपाली गांगुली एक मार्गदर्शक म्हणून एका नव्या भूमिकेत पाऊल ठेवत आहे. उत्साही आणि मनोरंजन वातावरणात अभिनेत्री मुलांच्या गटाशी प्रामाणिक संवाद साधीत ही मालिका हास्य, निरागसता आणि जीवनाचे धडे देणारे असणार आहे.
‘दिल की बातें’ हा कार्यक्रम अनुपमाच्या शहाणपणाचे आणि मुलांच्या प्रामाणिक, निरपेक्ष जगाचे एक नेमके टिपण सादर करेल. खेळकर चर्चा, हृदयस्पर्शी क्षण आणि न संपणारे हास्य याद्वारे, या मालिकेचा प्रत्येक भाग सर्व वयोगटातील प्रेक्षकांकरता काहीतरी खास सादर करणार आहे. जे पाहताना प्रेक्षकांना नक्कीच याचा आनंद होणार होणार आहे.
अभिमानास्पद! दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान
रूपाली गांगुलीचा खास लाघवी स्वभाव आणि गोंडस बालकलाकार यांसह, ही मालिका प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याकरता, जुन्या आठवणींना उजाळा देण्याकरता आणि कायमस्वरूपी आठवणी निर्माण करण्याकरता सज्ज झाली आहे. तुम्ही अनुपमाचे जुनेजाणते चाहते असाल अथवा आनंदी, रंजक कौटुंबिक कार्यक्रमाच्या शोधत असाल, तर ही मालिका नक्कीच तुमच्याकरता योग्य आहे. ही मालिका नक्कीच तुमचं भरभरून मनोरंजन करणार आहे. ९ जूनपासून ‘स्टार प्लस’ वाहिनीवर ‘दिल की बातें’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.