(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
‘अॅनिमल’ चित्रपटात बॉबी देओलने अबरारची भूमिका साकारल्यापासून त्याच्या चाहत्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. २७ जानेवारी रोजी अभिनेत्याचे काही चाहते त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घराबाहेर आले होते. तसेच अभिनेत्याने स्वतःचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला आला. बॉबी देओल देखील त्याच्या चाहत्यांना मोठ्या प्रेमाने भेटताना दिसला आहे. चाहते त्याला पाहून खूप आनंदी दिसत आहेत. तसेच अभिनेत्याला अनेक चाहत्यांसह कलाकारांच्याही शुभेच्छा येत आहेत.
King: ‘किंग’ चित्रपटाचे दिग्दर्शन सांभाळणार सिद्धार्थ आनंद; शाहरुख खानने सोडले मौन, केला खुलासा!
चाहते केक आणि मोठा लाडू घेऊन आले
बॉबी देओलचे अनेक चाहते त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या घराबाहेर जमले होते. घराबाहेर चाहत्यांनी अभिनेत्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे गाणे गायले. तसेच, काही चाहते बॉबी देओलसाठी एक मोठा केक आणि एक मोठा लाडू घेऊन आले होते. या अभिनेत्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसमोर केक आणि लाडू कट केला. यावेळी तो खूप आनंदी दिसत होता. तसेच अभिनेत्यासह त्याच चाहते देखील खूप खुश दिसत होते.
अभिनेत्याने चाहत्यांचे आभार मानले
केक कापल्यानंतर, बॉबी देओलने चाहत्यांचे इतके प्रेम दिल्याबद्दल आभार मानले. तसेच, चाहत्यांच्या आणि पापाराझींच्या विनंतीनुसार, बॉबी देओलने ‘अॅनिमल’ चित्रपटातील एक सिग्नेचर सीन देखील सादर केला. जेव्हा बॉबीने चित्रपटातील दृश्य पुन्हा तयार केले तेव्हा चाहत्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. चाहत्यांना त्याला अभिनय करताना पाहून खूप आनंद झाला.
आश्रम मालिकेबाबत अपडेट दिले
अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त बॉबी देओलने चाहत्यांना सांगितले की तो त्याच्या ‘आश्रम’ या वेब सिरीजच्या पुढील सीझनची वाट पाहत आहे. तो या मालिकेतील ‘जपनम’ हा संवाद बोलतानाही दिसला. या मालिकेत, बॉबीचे पात्र त्याच्या भक्तांना लाडू खाऊ घालून नियंत्रित करायचे. म्हणूनच चाहत्यांनी बॉबी देओलसाठी एक मोठा लाडू बनवला आणि त्याच्या वाढदिवशी अभिनेत्याची आणला.