Chhaava Ott Release Know When And Where To Watch Vicky Kaushal Rashmika Mandanna Movie
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट करमुक्त केला आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाची चर्चा आता सर्वत्र सुरु झाली आहे. तसेच या चित्रपटाबाबत आता मोठी उपडेट समोर आली आहे. हा चित्रपट आता मध्य प्रदेशमधील ‘टॅक्स फ्री’ प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केली घोषणा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ही घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त, मी त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा हिंदी चित्रपट करमुक्त घोषित करण्याची घोषणा करतो.” असे म्हणून त्यांनी प्रेक्षकांना खुश करून टाकले आहे. तसेच या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
अनिल कपूरचा अन्नू कपूर कसा झाला ? वाचा नाव बदलण्यामागील माहित नसलेला किस्सा…
देवेंद्र फडणवीस यांनी छावाबद्दल मत केले व्यक्त
यापूर्वी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही छावा चित्रपट करमुक्त करण्याच्या आवाहनाचे स्वागत केले होते. त्यांनी चित्रपटाच्या ऐतिहासिक सादरीकरणाचे कौतुक केले आणि सांगितले की त्यांना लोकांकडून चित्रपटाबद्दल चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर एक अतिशय चांगला चित्रपट बनला आहे याचा मला आनंद आहे. जरी मी तो अद्याप पाहिलेला नाही, परंतु मला मिळालेल्या अभिप्रायावरून असे दिसून येते की या चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण झालेले नाही.” यासोबतच फडणवीस यांनी असेही सांगितले की महाराष्ट्राने २०१७ मध्ये मनोरंजन टॅक्स आधीच रद्द केला होता आणि आता ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत चित्रपट कसा पोहोचवता येईल याकडे लक्ष देणार आहेत.
छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती के अवसर पर उनके पुत्र संभाजी महाराज पर आधारित हिन्दी फिल्म ‘छावा’ को टैक्स फ्री करने की घोषणा करता हूं… pic.twitter.com/b6dm1sDH7P
— Dr Mohan Yadav (@DrMohanYadav51) February 19, 2025
या स्टार्सनी ‘छावा’ चित्रपटात केले काम
‘छावा’ हा चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्सने केली आहे. या चित्रपटात विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. याशिवाय, रश्मिका मंदान्ना यांनी त्यांची पत्नी येसूबाई भोसलेची भूमिका साकारली आहे, अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे, तर डायना पेंटीने जिनत-उन-निसा बेगमची भूमिका साकारली आहे, दिव्या दत्ताने सोयराबाईची भूमिका साकारली आहे, विनीत कुमार सिंग यांनी कवी कलशची भूमिका साकारली आहे आणि आशुतोष राणा यांनी हंबीरराव मोहितेची भूमिका साकारली आहे.
Chhaava: ‘छावा’ने केला २०० कोटींचा गल्ला पार, जाणून घ्या सहाव्या दिवशी किती केली कमाई!
आतापर्यंत केली एवढी कमाई
हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या मराठी कादंबरीचे रूपांतर आहे. त्याला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. सहा दिवसांत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने आतापर्यंत १९१ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.