(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
अलीकडेच कोल्डप्ले बँडने आपला भारत दौरा पूर्ण केला आहे, त्या दरम्यान बँडने अहमदाबाद आणि मुंबईत संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यानंतर, बँडचा फ्रंटमन क्रिस मार्टिन आणि त्याची मैत्रीण डकोटा जॉन्सन प्रयागराजमधील महाकुंभात पोहोचले, जिथे त्यांनी पवित्र गंगेत स्नान केले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
कुंभमेळ्यातील व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ख्रिस मार्टिन आणि डकोटा जॉन्सन गंगा नदीत डुबकी मारताना दिसत आहेत. हा व्हिडिओ एका वापरकर्त्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की ख्रिस आणि डकोटा या वापरकर्त्याच्या अगदी जवळ दिसत आहेत. या पोस्टमध्ये तो लिहितो की, त्याने कोल्डप्ले कॉन्सर्टऐवजी कुंभमेळा निवडला आणि महादेवाच्या कृपेने कोल्डप्ले त्याच्याकडे आला. व्हायरल व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये युजरने लिहिले की, “जेव्हा तुम्ही कॉन्सर्टला जाऊ शकत नाही, तेव्हा ते स्वतः तुमच्या भेटीस येतात. कुंभमेळ्यात कोल्डप्लेच्या क्रिस आणि डकोटासोबत संगममध्ये स्नान केले. तो सर्व संस्कृती आणि परंपरांचे पालन करत आहे. श्रद्धा सर्वांपेक्षा वर आहे, हर हर महादेव!” असे लिहून हा व्हिडीओ शेअर केला आहे.
वापरकर्त्यांनी केल्या मजेदार कमेंट्स
व्हायरल व्हिडिओवर वापरकर्त्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत, ज्यामध्ये एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, ‘कॉन्सर्ट फक्त एक निमित्त होते, कोल्डप्लेला महाकुंभात यायचे होते’, असे अनेक चाहत्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. भारत दौऱ्यादरम्यान, क्रिस आणि डकोटा जॉन्सन यांनी मुंबईतील बाबुलनाथ मंदिराला भेट दिली आणि डकोटाने सोनाली बेंद्रे आणि गायत्री जोशी यांच्यासोबत सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली.
भारतात कोल्डप्ले कॉन्सर्ट
ब्रिटिश बँड कोल्डप्लेने १८ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान भारताचा दौरा केला आणि ‘म्युझिक ऑफ द स्फेयर्स वर्ल्ड टूर’चा भाग म्हणून अहमदाबादमध्ये त्यांचा शेवटचा संगीत कार्यक्रम आयोजित केला. या संगीत कार्यक्रमांमध्ये चाहत्यांना खूप आनंद मिळाला. तसेच हा कॉन्सर्ट चाहत्यांच्या खूप पसंतीस आहे. या कॉन्सर्टला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या कॉन्सर्टला अनेक कलाकारांची देखील उपस्थिती लागली आहे.