(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय खन्ना सध्या त्याच्या “धुरंधर” या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या “रहमान डकैत” या भूमिकेला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः अभिनेता एन्ट्री सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अक्षय खन्नाने अनेक बॉलीवूड चित्रपटामध्ये काम केले आहे, परंतु या चित्रपटांमुळे अभिनेत्याला फार यश मिळाले नाही. यानंतर २०२५ मध्ये अक्षय खन्नाचे नशीब बदलले, आणि त्याने ‘छावा’ चित्रपटामध्ये औरंगजेब यांची भूमिका साकारली. अक्षय खन्नाचा या चित्रपटामधील लूक प्रेक्षकांना खूप आवडला. आणि अभिनेता त्याच्या नुकत्याच चर्चेत असलेल्या ‘धुरंधर’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.
अभिनेत्याच्या कारकिर्दीची एक शानदार सुरुवात
अक्षय खन्नाने १९९७ मध्ये “हिमालय पुत्र” या चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट सिनेमागृहात चांगला चालला नाही, परंतु त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या “बॉर्डर” या चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांची मने जिंकली. विनोद खन्नाचा मुलगा असूनही, अक्षयने त्याच्या कठोर परिश्रमाने स्वतःला स्थापित केले. त्याने “दिल चाहता है”, “हमराझ”, “हंगामा”, “हलचल”, “दृश्यम २” आणि अलिकडेच “छावा” यासारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे. आणि आपले नाव प्रसिद्ध केले.
“धुरंधर” च्या धमाकेदार एन्ट्री सीन चर्चेत
“धुरंधर” चित्रपटातील अक्षयचा एन्ट्री सीन अद्भुत आहे. वाळवंटात काळा चष्मा घातलेला, तो त्याच्या गँगस्टर लूकमध्ये आकर्षित आणि खतरनाक दिसतो आहे. या सीनसोबत आलेले बहरीनी रॅप गाणे “FA9LA” रातोरात हिट झाले. या गाण्यावर चाहते रील तयार करत आहेत आणि त्याचे कौतुक करत आहेत. तसेच या चित्रपटामध्ये अक्षय खन्नाने खलनायकाची भूमिका साकारली आहे.
अक्षय खन्नाची एकूण संपत्ती
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय खन्नाची नेट वर्थ अंदाजे ₹१६७ कोटी आहे. हा अभिनेता सोशल मीडियावर सक्रिय नाही आणि तो खूप साधे जीवन जगणारा अभिनेता आहे. अक्षयकडे मुंबईच्या पॉश भागात आलिशान मालमत्ता आहेत, ज्यात जुहू, मलबार हिल आणि ताडदेव येथील अनेक आलिशान घरांचा समावेश आहे. अभिनेत्याची रिअल इस्टेट ₹१०० कोटींपेक्षा जास्त असल्याचे म्हटले जात आहे.
इस्कॉन मंदिरात ‘ही- मॅन’ ला वाहिली श्रद्धांजली; ९० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला संगीत कार्यक्रम
आलिशान गाड्यांचे कलेक्शन
अक्षय खन्नाने नेहमीच साधे जीवन जगणे पसंत केले आहे. म्हणूनच लोक त्याला आणखी प्रेम करताना दिसतात. अक्षयच्या गॅरेजमध्ये मर्सिडीज-बेंझ एस-क्लास, बीएमडब्ल्यू ५ सिरीज आणि टोयोटा फॉर्च्युनर सारख्या आलिशान कार आहेत. तसेच आता अभिनेता त्याच्या ‘धुरंधर’ चित्रपटामुळे आणखी चर्चेत आला आहे. या चित्रपटाने अवघ्या ४ दिवसांत कोटींची कमाई केली आहे.
‘धुरंधर’ चित्रपटाबद्दल
‘धुरंधर’ चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, आदित्य धर आणि लोकेश धर यांनी जिओ स्टुडिओज आणि बी ६२ स्टुडिओजच्या बॅनरखाली केली आहे. यात रणवीर सिंग, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्या भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या आहेत, तर सारा अर्जन आणि राकेश बेदी हे सहाय्यक भूमिकेत दिसत आहेत. ‘धुरंधर’ हा चित्रपट ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर १२६.५७ कोटींची कमाई केली आहे.






