(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माती आणि नृत्य दिग्दर्शिका फराह खानने नुकतेच सोशल मीडियावर तिचे लग्नाचे अनसीन फोटो शेअर केले आहे. फराह खान आणि तिचा पती शिरीष कुंदर यांच्या लग्नाला आता २१ वर्ष पूर्ण झाल्याचे फराह खानने सांगितले आहे. हे दोघेही त्यांच्या लग्नाचा २१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. फराह खानने लग्नाच्या आनंदाचे क्षण आठवत काही फोटो शेअर करून आकर्षित नोट देखील लिहिली आहे. ही पोस्ट पाहून चित्रपट इंडस्ट्रीमधील कलाकार तिचे अभिनंदन करत असून, काही चाहते तिच्या कॅप्शनचे कौतुक करत आहेत.
फराह खानचे लग्न खूप काळ टिकणार नाही असं वाटणाऱ्या आणि अविश्वास दाखवणाऱ्या लोकनावर टीका करत फराहने लग्नाचे फोटो शेअर करून, कॅप्शन मध्ये लिहिले, “२१ वर्षांपूर्वी एका मैत्रिणीने (जिला आमच्या लग्नाला कोणीही आमंत्रित केलेही नव्हते) तिने एक वाईट कमेंट केली होती की “मी माझ्या पुढच्या लग्नाला उपस्थित राहील..’ आता मला माफ कर सखी, हे लग्न आतापर्यंत ठीक आणि चांगलं चाललं आहे.” असे लिहून फराहने अविश्वास दाखवणाऱ्या लोकनावर टीका केली आहे.
तसेच, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिरीषसाठी फराहने लिहिले, “हॅपी एनिव्हर्सरी @shirishkunder.. आपण सार्वजनिक ठिकाणी हात धरू शकत नाही (त्यासाठी तुला माझ्यासोबत बाहेर पडावे लागेल) पण आम्ही आमच्या कुटुंबाला एकत्र ठेवतो.. आणि मी तुला थोडंसं लाजवेल आहे??” असे लिहून फराह खानने ही पोस्ट शेअर केली आहे. या शेअर केलेल्या पोस्टमध्ये फराह आणि शिरीषचे लग्नाचे फोटो दिसत आहेत, ज्यामध्ये दोघेही खूप आनंदी आणि सुंदर दिसत आहेत.
खरं तर, फराह आणि शिरीषची प्रेमकथा “मैं हूं ना” या चित्रपटाच्या सेटवरून सुरु झाली, जिथे फराह दिग्दर्शिका होती आणि शिरीष निर्माता होता. फराह शिरीषला आधीपासूनच खूप आवडत होती आणि त्यामुळेच शिरीषने चित्रपटात काम करण्यास होकार दिला. शिरीषच्या प्रेमाबद्दलच्या भावना जाणून फराह खानने देखील कालांतराने त्याच्या प्रेमात पडली. आणि या दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. आणि दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर डिसेंबर २००४ मध्ये या जोडप्याने नोंदणीकृत लग्न केले, त्यानंतर त्यांचे हिंदू विधीनुसार लग्न झाले जिथे शाहरुख खान आणि गौरी यांनी फराहचे कन्यादान केले. यानंतर २००८ मध्ये या जोडप्याने दोन मुली आणि एक मुलगा – दिवा, अन्या आणि झार. यांचे त्यांच्या आयुष्यात स्वागत केले.






