(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातील उपविजेता, अभिनेता जय दुधाणे सध्या मोठ्या वादात सापडला आहे. जय दुधाणेला ठाणे पोलिसांनी मुंबई विामनतळावरून ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, जय दुधाणे याच्यावर सुमारे 5 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. एका मालमत्तेची बनावट कागदपत्रे तयार करून ती अनेक लोकांना विकल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी ठाणे पोलीस अधिक तपास करत आहेत. विशेष बाब म्हणजे, अवघ्या 10 दिवसांपूर्वीच जय दुधाणे याचे लग्न झाले होते. लग्नानंतर लगेचच अटकेची कारवाई झाल्याने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.या कारवाईमुळे फक्त जयच नव्हे तर त्याच्या कुटुंबातील आई, बहीण, आजी, आजोबा यांचीही चौकशी केली जाणार आहे.नेमकं काय प्रकरण आहे जाणून घ्या
जय दुधाणेला अटक, नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, जय दुधाणेने बनावट कागदपत्र तयार करून लोकांना दुकानं विकली. दुकानांच्या या विक्रिचा व्यवहार जयने बेकायदेशीरपणे केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे ही दुकाने खरेदी केलेल्या अनेक लोकांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणामुळे जय आणि त्याच्या कुटुंबाची चौकशी केली जाणार आहे. यासंबंधी जय किंवा त्याच्य टीमने कोणतंही अधिकृत स्टेटमेंट दिलं नाही. सध्या ठाणे पोलीस जय दुधाणेची कसून चौकशी करत असून या फसवणूक प्रकरणामागील नेमका कट, आर्थिक व्यवहार आणि इतर संबंधित व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जय दुधाणे हा बिग बॉस मराठी 3च्या शोमधून घराघरात पोहोचला, तो splitsvilla च्या 13 व्या पर्वाचा विजेता ठरला होता. अशा विविध शोमध्ये तो झळकला आहे. याशिवाय स्टार प्रवाहच्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेत सुद्धा त्याने काम केलं होते. मात्र काही महिन्यांनी वैयक्तिक कारणास्तव जयने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.आता या फसवणूक प्रकरणामुळे जय दुधाणेच्या करिअरवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






