(फोटो सौजन्य - x अकाउंट)
अभिनेता-दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव आज २९ एप्रिल त्याचा ४५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. प्रियदर्शन हा केवळ अभिनेताच नाही तर दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक देखील आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटामधील काम प्रेक्षकांना खूप आवडले आहे आणि त्यांनी त्याच्या प्रत्येक भूमिकेचे कौतुक देखील केले आहे. २००६ मध्ये केदार शिंदे यांच्या ‘जत्रा’ या चित्रपटातून अभिनेत्याने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. आणि या नंतर अनेक सुपरहिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले. आज अभिनेत्याने त्याच्या कामामुळे स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. वाढदिवसानिमित्त आज कलाकारांसह अनेक चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत.
‘मस्का’
माया (प्रार्थना बेहेरे), यादव (शशांक शेंडे) आणि चिकू (प्रणय रावराणे) या तीन व्यावसायिक कलाकारांभोवती फिरणारा ‘मस्का’ या चित्रपटातून प्रियदर्शन जाधवने दिग्दर्शनात पदार्पण केले. प्रियदर्शन जाधव कलाकारांकडून चांगला अभिनय काढण्यात यशस्वी झाला आहे. ‘मस्का’ चित्रपट प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारा आणि कॉमेडी चित्रपट आहे.
‘सायकल’
प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘सायकल’ या चित्रपटात प्रियदर्शन जाधव, दीप्ती लेले, भाऊ कदम आणि हृषीकेश जोशी यांच्यासोबत काम करताना दिसला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. हा चित्रपट तुम्हाला स्वातंत्र्योत्तर काळात, कोकणातील एका छोट्या गावात घेऊन जातो. प्रियदर्शन जाधवचे पात्र या चित्रपटामध्ये चकित करणारे आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला आणि त्यांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद देखील दिला.
‘चोरीचा मामला’
प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित ‘चोरीचा ममला’ मध्ये अमृता खानविलकर, हेमंत ढोमे, अनिकेत विश्वासराव आणि क्षिती जोग यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते. हा विनोदी-चित्रपट नंदन (जितेंद्र जोशी यांनी साकारलेला) एक ‘प्रामाणिक चोर’, पैसे चोरण्यासाठी राजकारण्याच्या फार्महाऊसमध्ये घुसतो. आणि त्यानंतर या घडते हे सगळं या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे.
‘Family Man 3’ फेम अभिनेता रोहित बासफोर यांचे निधन, कुटुंबाला हत्येचा संशय!
‘धिंगाणा’
चंद्रकांत दुधगावकर दिग्दर्शित ‘धिंगाणा’ एका गावात घटनेवर आधारित आहे जिथे एक प्रामाणिक आणि प्रिय जोडपं (प्रियदर्शन जाधव आणि प्राजक्ता हणमघर) गावकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करत आहेत. यात अंशुमन विचारे, अवतार गिल, रझा मुराद, शाहबाज खान आणि कुनिका यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाची कथा आणि कॉमेडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे.
‘टाइमपास २’
टाइमपास २ हा रवी जाधव दिग्दर्शित चित्रपटामध्ये प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच त्याने दगडू आणि अभिनेत्रीने प्राजक्ताची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले.