(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
टेलिव्हिजनवरील लिकप्रिय कॉमेडियन कपिल शर्माचा शो, “द ग्रेट इंडियन कपिल शो” प्रेक्षकांचा आवडता शो आहे. तो नेटफ्लिक्सवर प्रसारित होतो. अलीकडेच, त्याच्या नवीन सीझनचा पहिला भाग प्रीमियर झाला, ज्यामध्ये प्रियांका चोप्रा पाहुणी म्हणून उपस्थित झाली होती. परंतु, हा शो कॉपीराइट उल्लंघनाच्या वादात अडकला आहे. त्याच्या एपिसोडमध्ये बॉलीवूड गाणी वापरल्याबद्दल कायदेशीर अडचणीत सापडला आहे, ही सर्व गाणी नेटफ्लिक्सवरील तिसऱ्या सीझनमध्ये दाखवण्यात आली होती.
भीतीचे दुसरे उदाहरण होता रहमान डकैतचा भाऊ उजैर बलोच; जुन्या मुलाखतीने उडवली खळबळ
फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेड (पीपीएल) इंडियाने “द ग्रेट इंडियन कपिल शो” विरोधात मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. निर्मात्यांवर परवानगीशिवाय तीन गाणी वापरल्याचा आरोप आहे. “मुन्ना भाई एमबीबीएस” (२००३) मधील “एम बोले तो”, “कांटे” (२००२) मधील “रामा रे” आणि “देसी बॉईज” (२०११) मधील “सुबा होने ना दे”. ही गाणी शोच्या तिसऱ्या सीझनमध्ये वापरली गेली होती. आणि याच गाण्यांमुळे आता हा शो अडचणीत आला आहे.
परवान्याशिवाय वाजवलेली गाणी
पीपीएल इंडियाचा दावा आहे की हे वापर कॉपीराइट कायदा, १९५७ अंतर्गत “सार्वजनिक कामगिरी/लोकांशी संवाद” श्रेणीत येतात. यासाठी हक्क धारकाकडून परवाना आवश्यक आहे. परंतु, परवाना मागितला गेला नाही किंवा मंजूरही करण्यात आला नाही. म्हणून, K9 फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड आणि बीइंगयू स्टुडिओज प्रायव्हेट लिमिटेड या निर्मिती कंपन्यांवर कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप करण्यात आला आहे.
Year-End 2025:TVFची पंचायत 4 ते द बॅड्स ऑफ बॉलीवुड, ‘या’ ठरल्या सर्वात चर्चित OTT सीरिज
या एपिसोड दरम्यान ही तीन गाणी वाजवली
शोचे तीन एपिसोड २१ जून ते २० सप्टेंबर दरम्यान प्रसारित झाले. पहिल्या एपिसोडमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर त्यांच्या “परम सुंदरी” चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. तेव्हा “एम बोले तो” हे गाणे वाजवण्यात आले. दुसऱ्या एपिसोडमध्ये “रामा रे ट्रॅक” होता, तर शेवटच्या एपिसोडमध्ये अक्षय कुमारचा “देसी बॉईज” चित्रपटातील “सुबा होने ना दे” हे गाणे देखील वाजवण्यात आले. या सगळ्यामुळे कपिलचा शो आता अडचणीत आला आहे.
चौथ्या सीझनबद्दल बोलायचे झाले तर, प्रियांका चोप्रा पहिल्या भागात दिसली होती. ती एसएस राजामौली यांच्या ‘वाराणसी’ चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये महेश बाबू देखील आहेत आणि हा चित्रपट १३०० कोटी रुपयांमध्ये बनवला जात आहे.






