फोटो सौजन्य - Social Media
शाहरुख खान बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. जगभरातील अनेक शहरांमध्ये त्यांची मालमत्ता आहे. मुंबईतील त्यांचे घर ‘मन्नत’ हे शहरातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. त्याची भेट घेण्यसाठी या ठिकाणी लोकांची गर्दी होत असते. याशिवाय किंग खानची दुबई आणि लंडनसारख्या ठिकाणीही प्रॉपर्टी आहे. अलीकडेच त्यांच्या घराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. चित्रांमध्ये त्यांच्या घराबाहेर ११७ क्रमांक लिहिलेला दिसत होता. लंडनमधील पार्क लेन या प्रतिष्ठित भागात अभिनेत्याचे हे घर आहे. त्याचे आलिशान घर छायाचित्रांमध्ये स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते. हे घर खूप मोठे आणि सुंदर देखील आहे. परंतु आता चाहते हे घर पाहून नाराजी व्यक्त करत आहेत.
इंटरनेटवर फोटो व्हायरल होत आहेत
शाहरुख खानच्या लंडनमधील बंगल्याची छायाचित्रे इंटरनेटवर चांगलीच धुमाकूळ घालत आहेत. एका यूजरने लिहिले की, “तुमच्यासाठी माझ्या मनापासून प्रार्थना. तू नेहमी माझ्या प्रार्थनेत असतोस. तू त्यासाठी पात्र आहेस. तू खूप मेहनत केली आहेस. हृदयाच्या राजा, नेहमी आनंदी राहा.” असे लिहून चाहत्याने अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
shah rukh khan’s house in park lane (london). pic.twitter.com/vHDLrFTPVA
— αdil. (@ixadilx) March 22, 2022
फोटो पाहून चाहते संतापले
त्याच वेळी शाहरुखच्या काही खऱ्या चाहत्यांनी हे वैयक्तिक आयुष्याचे उल्लंघन मानले. एका चाहत्याने सांगितले की, “हे गोपनीयतेचे उल्लंघन आहे. शाहरुख देखील माणूस आहे. जर कोणी तुमच्या घराचा फोटो काढून तुमच्या घराचा नंबर दाखवला तर तुम्हाला कसे वाटेल?” दुसरा म्हणाला, ‘हे बरोबर नाही.’ असे लिहून चाहत्यांनी फोटो शेअर करणाऱ्या नेटकऱ्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
‘किंग’मध्ये बॉलिवूडचा बादशाह दिसणार आहे
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख खान लवकरच ‘किंग’ चित्रपटात काम सुरू करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट आधी सुजॉय घोष दिग्दर्शित करणार होता, पण आता या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये त्याच्यासोबत सुहाना खान आणि अभिषेक बच्चन देखील दिसणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.