(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
जय भानुशालीसोबत घटस्फोटाच्या अफवांवर माही विजने अखेर मौन सोडले आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेत्री माही विज आणि जय भानुशाली यांच्या घटस्फोटाच्या बातम्या जोरात व्हायरल होत आहेत. विविध माध्यमांमध्ये अशी चर्चा आहे की या जोडीने जुलै-ऑगस्ट महिन्यात घटस्फोटाची कागदपत्रे साइन केली असून, माहीने पाच कोटी रुपयांच्या पोटगीची मागणी केली आहे.
अभिनेत्री माही विज आणि जय भानुशाली यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनंतर आता माहीनं स्वतः यावर मौन तोडत आपल्या यूट्यूब चॅनेलवरून व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओत माही म्हणाली, “मला या विषयावर बोलायचंदेखील नव्हतं; पण आणखी अफवा आणि चर्चा होऊ नयेत म्हणून मला बोलावं लागतंय. कारण मला माहीत आहे, लोक फक्त कमेंट्स आणि लाइक्ससाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. मी वाचलं की मी घटस्फोटाची कागदपत्रं साइन केली आहेत. मग ती कागदपत्रं मला दाखवा! दुसरं म्हणजे, जोपर्यंत आम्ही काही बोलत नाही, तोपर्यंत आमच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करण्याचा कुणालाच अधिकार नाही.”
पुढे माही म्हणाली, “आम्ही सेलिब्रिटी आहोत. पण मी फक्त तितकंच सांगेन, जितकं मी सांगू इच्छिते. माझ्यावर आई म्हणून आणि माझ्या मुलांच्या जबाबदाऱ्या आहेत.”
तिनं व्हिडिओमध्ये तिच्या मुलगी खुशीचा मेसेजही दाखवला. खुशीने माहीला घटस्फोटाच्या अफवांबद्दल पोस्ट पाठवून विचारलं,“हे काय बकवास आहे?” या अफवांचा तिच्या कुटुंबावर मानसिक परिणाम होत आहे, आणि लोकांनी अफवा पसरवण्याआधी जबाबदारीने वागायला हवं.
यानंतर माहीने पोटीगबद्दलही तिचे मत व्यक्त केले आहे. ती म्हणाली,”जेव्हा मार्ग वेगळे होतात, तेव्हा प्रत्येकांने स्वत:कमावले पाहिजे आणि जेव्हा आपला जोडीदार सोबत असतो, तेव्हाही प्रत्येक मुलीने आर्थिकदृष्या स्वावलंबी राहावे आणि फक्त वडील आणि आपल्या पतीवर अवलंबून राहू नये. पोटीगीबाबत बोलायचे झालं, तर जोपर्यंत माझ्याकडून तुम्ही ऐकत नाही, तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.”






