(फोटो सौजन्य - Instagram)
सौदी अरेबियाच्या बहुप्रतिक्षित अॅक्शन-कॉमेडी चित्रपट ‘७ डॉग्स’ चा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये बॉलीवूडचे दोन स्टार सलमान खान आणि संजय दत्त यांची पहिली झलकही पाहायला मिळाली आहे. दोन्ही स्टार्सना त्यांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटात पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत. टीझरमध्ये दोन्ही स्टार्स एका दमदार शैलीत दिसत आहेत. त्यांना बॉलीवूड अभिनेत्यांना एकत्र पाहून चाहते खुश झाले आहेत. ‘७ डॉग्स’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
दोन्ही स्टार्स एका दमदार अंदाजात दिसले
‘७ डॉग्स’ हा आदिल एल अरबी आणि बिलाल फल्लाह दिग्दर्शित एक आंतरराष्ट्रीय चित्रपट आहे. दोघेही ‘बॅड बॉईज फॉर लाईफ’ आणि ‘मिस मार्वल’ साठी ओळखले जातात. टीझरमध्ये संजय दत्त अॅक्शन करताना दिसत आहे, तर सलमान खानचीही एक जबरदस्त झलक पाहायला मिळावी आहे. तथापि, दोन्ही स्टार्सच्या भूमिका अद्याप उघड झालेल्या नाहीत.
मल्याळम अभिनेता Shine Tom Chacko चा अपघात, वडिलांचा जागीच मृत्यू!
سيكون نقله نوعيه في عالم وتاريخ السينما في المنطقه وتم تصويره بالكامل في الرياض في استديوهات الحصن BigTime في الرياض pic.twitter.com/iqLrnBHEmm
— TURKI ALALSHIKH (@Turki_alalshikh) June 5, 2025
या चित्रपटात आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांची कथा
या चित्रपटात अरब चित्रपटसृष्टीतील पॉवरहाऊस करीम अब्देल अझीझ आणि अहमद एझ आहेत, जे इजिप्तमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ‘किरा अँड एल जिन’च्या यशानंतर पुन्हा एकत्र आले आहेत. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीच्या कथेवर आधारित, हा चित्रपट इंटरपोल अधिकारी खालिद अल-अज्जाजीवर आधारित आहे, जो ‘७ डॉग्स’ सिंडिकेटचा वरिष्ठ सदस्य गली अबू दाऊदला पकडतो. चित्रपटाची रिलीज तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. तथापि, तो या वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर जबरदस्त आहे.
अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत भर गर्दीत घडली विचित्र घटना, पापाराझी म्हणाले- ‘भाऊ तुमची चैन…’
संजय दत्त ‘हाऊसफुल ५’ मध्ये दिसणार आहे
सलमान खान आणि संजय दत्त यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सलमान खान शेवटचा या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘सिकंदर’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकला नाही. तर संजय दत्त आज प्रदर्शित झालेल्या ‘हाऊसफुल ५’ चित्रपटात दिसला आहे. यापूर्वी तो या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘द भूतनी’ चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसला होता.