(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सिद्धार्थ मल्होत्रा सध्या त्याच्या ‘परम सुंदरी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. जान्हवी कपूरसोबतचा त्याचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण याच दरम्यान, चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ समोर आला ज्यामुळे सिद्धार्थच्या चाहत्यांमध्ये चर्चा आणि वाद दोन्ही निर्माण झाला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि या व्हिडीओमध्ये नक्की काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
सिद्धार्थने हत्तीला दिले पाणी
व्हिडिओमध्ये अभिनेता हत्तीला पाणी देताना दिसत आहे. सिद्धार्थ सेटवर मजा करताना दिसला, पण त्याची पाणी देण्याची पद्धत काही लोकांना आवडली नाही. हे प्रकरण इतके वाढले की सोशल मीडियावर लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. व्हिडिओ सामान्य दिसत आहे पण काही लोकांना तो आवडला नाही. काही चाहत्यांची मने या व्हिडीओमुले दुखावली गेली आहे. आता या व्हिडीओ मध्ये नक्की असे काय आहे ज्यामुळे लोकांची मने दुखावली गेली आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.
सिद्धार्थला का ट्रोल करण्यात आले?
व्हिडिओमध्ये, अभिनेता हातात एक ग्लास धरलेला दिसत आहे. प्रथम तो स्वतः त्या ग्लासमधून पाणी पितो आणि नंतर तेच पाणी हत्तीला देतो. या दरम्यान, तो विनोदाने ‘चीअर्स’ म्हणतो आणि हत्तीला ‘गुड गर्ल’ असेही म्हणतो. त्यानंतर लगेचच या व्हिडीओवर आता कंमेंटचा वर्षाव होत आहे. काही चाहते या व्हिडीओला पसंत करत आहेत तर काहींना हा व्हिडीओ आवडला नाही आहे.
हत्तीला उष्टावलेले पाणी देण्यात आले
खरं तर भारतात हत्तीला गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच अनेक वापरकर्त्यांनी सिद्धार्थच्या या कृतीला देवाचा अनादर म्हटले. सोशल मीडियावरील एका वापरकर्त्याने लिहिले – ‘हत्ती हे गणपतीचे रूप आहे, तुम्ही त्याला उष्टावलेले पाणी कसे देऊ शकता?’ दुसऱ्याने संतप्त इमोजी बनवताना कमेंट केली – ‘हे पूर्णपणे चुकीचे आहे, हे देवाचा अनादर आहे.’ अनेकांनी याला ‘अज्ञान’ म्हटले, तर काहींनी म्हटले की एक मोठा स्टार असल्याने त्याने त्याची जबाबदारी समजून घेतली पाहिजे. तसेच, अनेक चाहत्यांनी त्याचा बचावही केला आहे.
Bigg Boss 19: कुनिका नंतर, आता ‘हा’ स्पर्धक घरावर करणार राज्य; घरातील सदस्यांनी कोणाला बनवले कॅप्टन?
‘परम सुंदरी’ चित्रपटाचे कलेक्शन
‘परम सुंदरी’ हा चित्रपट २९ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रेम मिळाले आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७.२५ कोटी रुपयांची कमाई केली. शनिवारी या चित्रपटाने ९ कोटी रुपये कमावले. रविवारी या चित्रपटाने १०.४५ कोटी रुपये कमावले. ‘परम सुंदरी’ने आतापर्यंत २६.९५ कोटी रुपये कमावले आहेत. तुषार जलोटा दिग्दर्शित या चित्रपटात जान्हवी कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, संजय कपूर, मनजोत सिंग आणि अभिषेक बॅनर्जी यांसारखे कलाकार काम करत आहेत.