(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
पंजाब सध्या पुराचा तडाखा सहन करत आहे. या आपत्तीमुळे अनेक कुटुंबे बाधित झाली आहेत. अनेक कुटुंबे अडचणीत आली आहे आहेत. त्यांची घरे या पुरामध्ये उध्वस्त झाली आहेत. अनेक कलाकार पंजाबला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत आणि त्यांच्या क्षमतेनुसार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आता बॉलीवूड अभिनेता सोनू सूद बाधित कुटुंबांना मदत करण्यासाठी अमृतसरला पोहोचला आहे. तसेच अभिनेता त्या सगळ्यांना जास्तीत जास्त घर बांधून देणार असल्याचे सांगत आहे.
गणपती विसर्जनानंतर अक्षय कुमारने केले असे काही की, युजर्सने केले कौतुक; म्हणाले ‘खिलाडी एक नंबर’
काय म्हणाला अभिनेता?
एएनआयशी बोलताना सोनू सूद म्हणाला, ‘मी बागपूर, सुलतानपूर लोधी, फिरोजपूर, फाजिल्का, अजनाला येथे जात आहे आणि मी तिथे जाऊन परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. मला वाटते की येत्या काळात पंजाबमध्ये अजूनही पाऊस पडत असल्याने अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत, लोकांचे जीवनमान उद्ध्वस्त झाले आहे. म्हणून मी शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करेन आणि स्थानिक प्रशासनाकडून त्यांच्या गरजांची यादी घेईन.’ असे म्हणून अभिनेता अजूनही लोकांना मदत करत आहे.
#WATCH | Punjab | Actor Sonu Sood reaches Amritsar airport to visit the flood-affected areas of the state.
He says, “I am going to Baghpur, Sultanpur Lodhi, Firozpur, Fazilka, Ajnala, and I will try to go around and find out the situation. I feel that in the coming time, since… pic.twitter.com/tx3AurFKlk
— ANI (@ANI) September 7, 2025
मी घरे बांधण्याचा प्रयत्न करेन
सोनू सूद पुढे म्हणाला, ‘हे एका आठवड्याचे किंवा दहा दिवसांचे काम नाही. पंजाबला पुन्हा त्याच्या पायावर उभे करण्यासाठी किमान काही महिने लागतील. मला वाटते की सर्वजण पुढे येत आहेत. पण तरीही, पंजाबला लवकरात लवकर पुनरुज्जीवित करण्यासाठी आपल्याला अनेक लोकांची साथ हवी आहे. ज्यांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत त्यांच्यासाठी आपण एकत्रितपणे काही घरे बांधण्याचा प्रयत्न करू. मी सर्वात जास्त प्रभावित गावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन.’
या कलाकारांनी पुढे केला मदतीचा हात
आतापर्यंत सोनू सूद व्यतिरिक्त दिलजीत दोसांझ, एमी विर्क, संजय दत्त, हिमांशी खुराना आणि जसबीर बस्सी या कलाकारांनी पंजाबसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. हे सगळे कलाकार शक्य तेवढी मदत लोकांना करत आहेत.