(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘या अली’ या गाण्याने जगभरात ओळख मिळवलेला लोकप्रिय गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूने संपूर्ण देशाला हादरवलं आहे. त्याच्या निधनामुळे आसाम सरकारने २० ते २२ सप्टेंबर या तीन दिवसांसाठी राज्य दुखवटा जाहीर केला आहे. २१ सप्टेंबरला त्याचे पार्थिव त्याच्या निवासस्थानी नेण्यात आले. झुबीनचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी गायकाच्या चाहत्यांनी रस्त्यावर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. झुबीन गर्ग यांचे पार्थिव सरुसुजाई स्टेडियममध्ये ठेवले गेले, जेणेकरून आसामकरांना त्यांचे अंतिम दर्शन घेता येईल. तसेच गायकाच्या मृत्यूने सगळ्यांचा धक्का बसला आहे. आणि अखेर या मृत्यूचं कारण समोर आलं आहे.
संजय दत्तचं रेस्टॉरंट लॉन्च, पत्नी सोबत दिसला आपल्या ‘संजू बाबा’ अंदाजात! व्हिडिओ व्हायरल
सिंगापूर उच्चायोगाने गायक झुबीन गर्ग यांचे मृत्युपत्र आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना पाठवले आहे. मृत्युपत्रात गायकाच्या मृत्युचे कारण स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. हे मृत्युपत्र मिळाले असूनही, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी झुबीनच्या मृत्युची चौकशी करण्याचे आश्वासन कुटुंबाला दिले आहे. आता या मृत्युपत्रात नक्की काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
मुख्यमंत्री म्हणाले, “आम्ही हे कागदपत्र सीआयडीकडे पाठवू.”
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, “सिंगापूर उच्चायोगाने झुबीन गर्ग यांचे मृत्युपत्र पाठवले आहे, ज्यामध्ये बुडून मृत्यूचे कारण नमूद केले आहे, परंतु हा पोस्टमार्टम रिपोर्ट नाही. पोस्टमार्टम रिपोर्ट मृत्युपत्रापेक्षा वेगळा आहे. आम्ही हे कागदपत्र सीआयडीकडे पाठवू. आसाम सरकारचे मुख्य सचिव शक्य तितक्या लवकर पोस्टमार्टम रिपोर्ट मिळविण्यासाठी सिंगापूरच्या राजदूतांशी संपर्क साधत आहेत.”
जुई गडकरीचा तो प्रसंग! “दिवसभर बसवून ठेवले, मालिकेतून काढले बाहेर…”
गायक झुबीन गर्गचा मृत्यू कसा झाला?
गायक झुबीन गर्ग यांचे १९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग अपघातात निधन झाले. ते ईशान्य भारत महोत्सवासाठी सिंगापूरमध्ये होते. त्यांच्या मृत्यूनंतर, महोत्सवाच्या आयोजकांनी एक निवेदन जारी केले की झुबीन गर्ग यांना स्कूबा डायव्हिंग करताना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यांना सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांच्यावर सीपीआर करण्यात आला. झुबीनला जिवंत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. नंतर त्यांचा मृतदेह दिल्लीला आणण्यात आला. गायकाचा मृतदेह रविवारी सकाळी गुवाहाटीत पोहोचला.