(फोटो सौजन्य - Instagram)
प्रसिद्ध पॉप गायिका दुआ लिपाने तिच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू केला आहे. तिने बॉयफ्रेंड आणि अभिनेता कॅलम टर्नरशी गुपचूप साखरपुडा केला आहे. तिने स्वतः तिच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे. अर्थात, दुआ लिपाच्या साखरपुडा झाल्याच्या बातम्या बऱ्याच काळापासून गॉसिप कॉरिडॉरमध्ये पसरल्या होत्या. २०२४ च्या ख्रिसमसमध्ये, जेव्हा तिच्या हातात हिऱ्याची अंगठी दिसली तेव्हा तिचा साखरपुडा झाल्याची चर्चा सुरु झाली. आता गायिकेने स्वतःच ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
गायिकेने दिली आनंदाची बातमी
ब्रिटिश व्होगशी झालेल्या संभाषणात, गायिका दुआ लिपा हिने तिच्या साखरपुड्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. ती म्हणाली, ‘हो, आम्ही साखरपुडा केला आहे. ही खूप रोमांचक गोष्ट आहे.’ असे म्हटले आहे. जानेवारी २०२४ पासून एकमेकांना डेट करणाऱ्या दुआ लिपा आणि कॅलम टर्नर, त्यांच्या साखरपुड्याची बातमी ऐकून त्यांचे चाहतेही खूप आनंदी आहेत.
Ahmedabad Plane Crash: विक्रांत मेस्सीवर कोसळला दुःखाचा डोंगर, अहमदाबाद दुर्घटनेत चुलत भावाचा मृत्य
कॅलम टर्नरने दिली हिऱ्याची अंगठी
दुआ लिपा म्हणाली की तिचा बॉयफ्रेंड कॅलम टर्नरने त्याच्या कुटुंबासह एक हिऱ्याची अंगठी बनवली, जी त्याने दुआ लिपाला घालायला लावली. गायिकेने सांगितले की अंगठी डिझाइन करण्यापूर्वी टर्नरने तिच्या बहिणीचा आणि जिवलग मित्रांचा सल्ला घेतला. ती म्हणाली, ‘मला त्याबद्दल खूप आवड आहे. तो अगदी माझ्यासारखीच आहे. ज्या व्यक्तीसोबत तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य घालवणार आहात ती व्यक्ती तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ओळखते हे जाणून घेणे गरजेचे आहे.’ असं ती म्हणाली.
Breaking: करिष्मा कपूरचा Ex Husband संजय कपूरचे निधन, पोलो खेळतानाच आला हार्ट अटॅक
दुआ लिपा कधी लग्न करणार?
तिच्या लग्नाबद्दल बोलताना दुआ लिपा म्हणाली की सध्या ती आणि कॅलम टर्नर दोघेही वेळ काढत आहेत. गायिका म्हणाली, ‘मला माझे टूर, कॅलम टर्नरचे शूटिंग पूर्ण करायचे आहे. आम्ही या वेळेचा आनंद घेत आहोत. मी कधीही लग्नाबद्दल विचार केला नव्हता. मी कधी नवरी बनेल याचा विचार केला नव्हता. परंतु आता या सगळ्याचा मी विचार करत आहे.’ दुआ लिपा यांनी लग्नाला एक अतिशय खास अनुभूती म्हणून वर्णन केले आहे. तिच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होते की चाहत्यांना तिच्या लग्नाची वाट पहावी लागणार आहे.