"धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...", प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याची नेते देवेंद्र फडणवीसांसाठी खास पोस्ट
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा आज निकाल आहे. जवळपास संपूर्ण महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. निकालामध्ये महायुतीने २८८ पैकी २२८ जागांवर आघाडी मिळवली आहे. सलग तिसऱ्यांदा मिळालेले हे अभूतपुर्व यश पाहून संपूर्ण राज्यातून महायुतीचे कौतुक केले जात आहे. विशेष म्हणजे, राज्यातील भाजपा नेते देवेंद्र फडणवीस हे देखील नागपूर दक्षिण- पश्चिम या मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उभे होते. या मतदारसंघातूनही त्यांना सर्वाधिक मताधिक्य मिळत त्यांचा विजय झाला आहे. नेते देवेंद्र फडणवीस यांचा विजय जवळपास निश्चित झाल्यानंतर मराठी इंडस्ट्रीतील काही सेलिब्रिटींनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत त्यांचे कौतुक केले आहे.
‘बिग बॉस’ फेम अभिनेता अभिजीत केळकरने खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत त्यांचे कौतुक केले आहे. दरम्यान, अभिनेत्याने “धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला… नेते देवेंद्र फडणवीसजी, आपलं मनापासून, त्रिवार अभिनंदन…” असं कॅप्शन देत त्याने पोस्ट शेअर केलेली आहे. “असंख्य काजव्यांच्या एकत्र येण्याने रात्रीचा काळोख कमी होत नाही, पौर्णिमेचा चंद्र जरी सौम्य असला तरी रात्र प्रकाशमय केल्याशिवाय राहत नाही.” अशी पोस्ट शेअर करत अभिजीतने देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी २०१४, २०१९ आणि २०२४ या काळात भारतीय जनता पक्षाला १०० पेक्षा जास्त जागा जिंकवून दिल्या आहेत. २०१४ मध्ये भाजपचे १२३ उमेदवार जिंकले होते. २०१९ मध्ये १०५ आमदार निवडून आले होते. तर २०२४ च्या विद्यमान निवडणुकीत भाजपचे मागील दोन वेळेपेक्षा जास्त उमेदवार जिंकून आले आहेत. २०२४ च्या निवडणूकीत भाजपाला १३३ मतं मिळाली आहेत.
‘लोक काहीही म्हणतील…’, असित मोदींनी TMKOC च्या ‘जेठालाल’सोबतच्या वादावर सोले मौन!