PSI Arjun Official Teaser
अभिनेता अंकुश चौधरीने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत स्वत:चं अढळ स्थान निर्माण केलं आहे. सध्या अंकुश त्याच्या अपकमिंग चित्रपटामुळे चर्चेत आहे. अंकुशने त्याच्या वाढदिवशी म्हणजेच ३१ जानेवारीला अनेक सुपरहिट चित्रपटांची घोषणा केली होती. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे, ‘पी.एस.आय अर्जुन’ होय. ‘पी.एस.आय अर्जुन’ चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा झाल्यानंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटाचा टीझर आला आहे. चित्रपटाचा टीझर काही तासांपूर्वीच सोशल मीडियावर रिलीज झाला असून चित्रपटाच्या टीझरची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
‘मिसाईल मॅन’ची संघर्षयात्रा रुपेरी पडद्यावर येणार, एपीजे अब्दुल कलामांच्या बायोपिकची घोषणा
चित्रपटामध्ये, अभिनेता अंकुश चौधरी ‘पी.एस.आय अर्जुन’ची भूमिका साकारत आहे. अंकुशचा पोलिसांच्या वर्दीतील हा डॅशिंग लूक कमाल दिसत असून ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटानंतर दोन वर्षांनी अंकुश प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. नुकताच ‘पी.एस.आय अर्जुन’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून ९ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘पी.एस.आय अर्जुन’ या चित्रपटात अंकुश पहिल्यांदाच रुबाबदार पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. अंकुशला अशा नव्या रूपात बघून चाहते त्याच्या अपकमिंग चित्रपटासाठी उत्सुक आहेत. अंकुशची आकर्षक पर्सनॅलिटी आणि फॅशन सेन्समुळे तो तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहेच. स्टाईल आयकॉन असलेल्या अंकुशला ‘ट्रेंड सेंटर’ म्हणायला काहीच हरकत नाही.
हेल्दी कसे राहावे? ‘पारू’ने दिला सल्ला; नक्की वाचा
बऱ्याच चित्रपटातील त्याचे डायलॉग्स प्रचंड गाजले आहेत. आताही ‘पी.एस.आय अर्जुन’ मधील असाच एक डायलॉग सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे, तो म्हणजे ‘थांब म्हटलं की थांबायचं…’ या दमदार डायलॉगने सध्या अनेकांना वेड लावलं आहे. तरुणाई यावर रील्स बनवत आहेत. त्यामुळे अंकुश एका अनोख्या अंदाजात यात झळकणार असल्याचे दिसतेय! व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित ‘पी.एस.आय.अर्जुन’चे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत. येत्या ९ मे रोजी ‘पी. एस. आय. अर्जुन’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.