फोटो सौजन्य: नेहा शितोळे इन्स्टाग्राम
आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. शिवरायांची जयंती राज्यासह देशासह अवघ्या जगभरात आज साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आज ३९५ वी जयंती आहे. महाराजांची जयंती म्हटल्यावर ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. मराठीसह काही बॉलिवूड सेलिब्रिटी मंडळीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘शिवजयंती’च्या शुभेच्छा पोस्टच्या माध्यमातून देताना दिसत आहेत. नुकतीच अभिनेत्री नेहा शितोळे (Neha Shitole)ने काही तासांपूर्वी इन्स्टा पोस्ट शेअर केली आहे.
‘बिग बॉस मराठी २’ फेम नेहा शितोळे एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती प्रसिद्ध लेखिकाही आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या नेहाने शिवजयंतीनिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. नेहाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये, शिवरायांकडे आधुनिक मावळ्यांना सुबुद्धी देण्याची प्रार्थना केली आहे. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. गेल्यावर्षीही अभिनेत्री नेहा शितोळेची ‘शिवजयंती’निमित्त लिहिलेली खास पोस्ट खूप व्हायरल झाली होती. ती अनेकदा सामाजिक, राजकीय किंवा मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींवर भाष्य करण्याचा प्रयत्न करते.
रायगडावर शंभू राजांच्या चरणी ‘छावा’ झाला नतमस्तक, म्हणाला, ‘आयुष्यात पहिल्यांदाच…’
शेअक केलेल्या इन्स्टा स्टोरीवर नेहा शितोळेने लिहिलंय की, “एरवी समाजाला पोषक आणि उपयुक्त अशी एकही कौतुकास्पद गोष्ट हातून न घडलेल्या पण आज फेटे बांधून, नऊवारी साडी नेसून, लायकी नसनाताही कपाळावर चंद्रकोर मिरवत आणि छत्रपतींचा वारसा ( ओरडत, ओरबाडत ) नुसत्या घोषणा देत, गाडीचे आणि हॉनचे कर्कश्य आवाज करत, मध्यरात्री नंग्या तलवारी रस्त्यावरून घासत ठिणग्या उडवून त्यांची आणि महाराजांच्या कीर्तीची धार बोथट करणाऱ्या सर्व आधुनिक मावळ्यांना सुबुद्धी लाभो हीच छत्रपती शिवरायांचरणी प्रार्थना…”