(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मालिका आणि प्रेक्षकांचं नेहमीच एक खास नातं बनलेलं आहे. दिवसभर प्रेक्षक कितीही बिझी असला तरी वेळात वेळ काढून मालिका पाहण्याचा आनंद मात्र घेतो. घरातील गृहिणी असोत, वर्किंग महिला असोत किंवा पुरूष असोत मालिका या आवर्जून पाहिल्या जातात. टीव्ही वरील प्रत्येक मालिकेला प्रेक्षकांचं कुटुंबाचं भरभरून प्रेम मिळत. मराठी मालिका विश्वात येत्या सोमवार पासून महत्त्वाचा बदल पाहायला मिळणार आहे. मराठी टेलिव्हिजनवरील दोन मालिका सोमवार पासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाही आहेत. आता त्या कोणत्या मालिका आहेत? आणि का पाहायला मिळणार नाहीत? हे जाणून घेऊयात.
मराठी टेलिव्हिजनवर सध्या अनेक विषयाच्या मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. अनेक जुन्या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. तर काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नव्या मालिकांसाठी प्रेक्षकांनीही उत्सुकता दाखवली आहे. नव्या मालिकेत नवे कलाकार, नवी कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच आता काही जुन्या मालिका बंद होण्याच्या तयारीत आहेत. ज्यांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे.
सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. पण येत्या सोमवार पासून स्टार प्रवाहवरील दोन मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाहीत. कारण या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. प्रवाह दुपारमध्ये लागणारी ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार दुपारी 2 वाजता टेलिकास्ट होत होती. त्याचबरोबर शिवानी सुर्वेची ‘थोडं तुझं थोडं माझं’ ही मालिकाही संपणार आहे. ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता टेलिकास्ट होत होती. या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे. या मालिकेने चांगलीच चर्चा केली आहे.
The Bengal Files: बंगालमध्ये ‘अनधिकृत बंदी’ असतानाही ‘द बंगाल फाइल्स’ कोलकातामध्ये होणार प्रदर्शित
हे आहे कारण
स्टार प्रवाहवर दोन नव्या मालिका सुरू होत असल्याने या दोन मालिका सोमवारपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाहीत. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेच्या जागी रुपाली भोसलेची ‘लपंडाव’ ही मालिका टेलिकास्ट होणार आहे. तर ‘थोडं तुझं थोडं माझं’ या मालिकेच्या जागी ‘नशीबवान’ ही मालिका १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दोन नव्या मालिकेसाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. तसेच या मालिकांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे बाकी आहे.