(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री अमृता खानविलकर आज तिचा ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. अमृता खानविलकर, जी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात राहते, विविध रील्स आणि पोस्टच्या माध्यमातून ती चाहत्यांशी नेहमी जोडलेली असते. वाढदिवसाच्या दिवशी तिला चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने वाढदिवसाच्या आधीच तिला खास भेटवस्तू पाठवल्या होत्या, ज्याचा व्हिडीओ अमृता यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. तसेच, अभिनेत्री सोनाली खरेनेदेखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अमृताला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्रीच्या वाढदिवशी खास शुभेच्छा तिचा पती आणि अभिनेता हिमांशू मल्होत्राने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दिल्या. अमृता आणि हिमांशू सोबतच तिच्या सासरच्या मंडळींसोबतही हा खास दिवस साजरा केला आहे.
अमृता केक कापताना दिसत असल्याचा व्हिडीओ हिमांशूने शेअर केला आहे, ज्यामध्ये वाढदिवसाचा आनंद स्पष्ट दिसून येतो आहे. हिमांशूने पोस्ट करत लिहिले आहे, “हॅपी बर्थडे अमृता. या वर्षात तुला खूप प्रेम, आनंद, खूप सारं यश मिळो. स्वत:साठी उभं राहणं, आयुष्याने आपल्या पद्धतीने जगण्याची क्षमता असणारी आणि ठसा उमटवणारी याचं अप्रतिम उदाहरण आहेस. गेली २० वर्ष आपण एकमेकांना ओळखत आहोत. वेळ कसा गेला हे कळलंच नाही. खूप साऱ्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि प्रेम”, असं हिमांशूने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हा व्हिडिओ अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.यामध्ये तिच्यासोबत कुटुंबातील सर्वजण आहेत. केक कापल्यानंतर ती आणि हिंमाशू एकमेकांना केक देखील भरवत आहेत. यानंतर त्या सगळ्यांनी छान फोटो देखील काढले आहेत.
मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता हिमांशू मल्होत्रा यांनी २०१५ मध्ये लग्न केले. आता त्यांच्या वैवाहिक जीवनाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याआधी काही वर्ष ते एकमेकांना ओळखत होते.जरी अमृता आणि हिमांशू सोशल मीडियावर फारसे पोस्ट शेअर करत नसले तरी, त्यांच्या वाढदिवसासारख्या आणि इतर खास दिवशी ते कायम एकत्र दिसतात.






