‘असुरवन’ चित्रपटातून आदिवासी वारली संस्कृतीचे दर्शन
स्वप्नस्वरूप प्रस्तुत या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे मोशन पोस्टर, टीझर आणि ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. पोस्टरवरील वाघाच्या प्रतिमेने सजलेला मुखवटा, घनदाट जंगलाचे अद्भुत सौंदर्य आणि आदिवासी वारली संस्कृतीची उपस्थिती यामुळे चित्रपटाबद्दलची उत्कंठा आणखी वाढली आहे.
Mrs Deshpande Trailer रिलीज; Madhuri Dixitच्या रहस्यमय भूमिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
दिग्दर्शक सचिन आंबात सांगतात,”असुरवन हे माझ्या वडिलांचे स्वप्न आहे. आमची वारली संस्कृती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, जतन व्हावी, यासाठी मी हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. माझा भाऊ सागर रामचंद्र आंबात कार्यकारी निर्माता म्हणून संपूर्ण प्रकल्पात माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. मोशन पोस्टर आणि ट्रेलरवर प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक आहे.”
शूटिंग लोकेशनबद्दल सचिन आंबात सांगतात, “असुरवनचे संपूर्ण चित्रीकरण घनदाट जंगलात करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील विविध आदिवासी पाडे, बदलापूर येथील बोहोनोली गाव तसेच अंबरनाथमधील गोरपे गाव येथे शूटिंग झाले आहे. तसेच वारली संस्कृतीचे वारस सांगणारे एक प्राचीन मंदिरही चित्रपटात पाहायला मिळेल.
महिला दिनी उलगडणार ‘तिघीं’च्या आयुष्यातलं ‘चौथं पान’, ‘तिघी’ चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज
कथानकाविषयी सांगताना दिग्दर्शक म्हणतात, “वारली संस्कृती ही निसर्गाशी घट्ट जोडलेली संस्कृती आहे. ते निसर्गालाच देव मानतात. त्यांचे जीवन, रहाणीमान आणि खाद्यसंस्कृती, हे सर्व काही निसर्गाभोवतीच फिरते. जंगलाचे रक्षण करण्यासाठी ते ‘फिरसत्या’ किंवा जंगलरक्षक देवाला पुजतात. वाघोबा देवाला ते जंगलाचा राजा मानतात. वारली संस्कृतीतील ‘रवाळ’ हा दोन-तीन दिवस चालणारा पारंपरिक खेळ यात विशेष महत्वाचा. यात वाघाच्या मुखवट्यांसह नृत्य केले जाते, जे त्यांच्या दैवी शक्तीचे प्रतीक मानले जाते.”
ते पुढे सांगतात, “मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच शापित जंगलाची, सस्पेन्स आणि थ्रिलरने परिपूर्ण अशी कथा आम्ही घेऊन आलो आहोत. प्रेक्षकांना हा भावनिक, सांस्कृतिक आणि रहस्यमय अनुभव नक्कीच भावेल याची मला खात्री आहे. सर्व रसिकांना विनंती आहे की त्यांनी ५ डिसेंबरला ‘असुरवन’ चित्रपट थिएटरमध्ये जाऊन जरूर पाहावा.”






