(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, बिग बॉसच्या घरातील खेळाला कलाटणी देणारी ‘पॉवर की’ (Power Key) एका विशिष्ट टास्कदरम्यान महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. बिग बॉस रुचिताला सांगताना दिसत आहेत पॉवर चेंबरमध्ये येण्यासाठी पॉवर की गरजेची आहे. मात्र, या ‘पॉवर की’ चा वापर करताना रुचिताकडून काहीतरी मोठी चूक घडल्याचे संकेत मिळत आहेत. “पॉवर की ला हलक्यात घेणं आता रुचिताला भारी पडल्याचे दिसत आहे. आणि आता हेच तिच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. येणाऱ्या भागात हाच रंगतदार खेळ चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
ही पॉवर की रुचिताला वाचवणार की तिला थेट अडचणीत टाकणार? या चुकीमुळे तिला घरातील कामांची शिक्षा मिळणार की नॉमिनेशनमध्ये जावं लागणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. करणने पॉवर key देण्यास नकार दिला, बिग बॉस स्पर्धकांना सांगतात पॉवर key करणने घेतली आहे. रुचिता त्याच्या पाया पडताना, त्याची माफी मागताना दिसत आहे. बघूया आता पुढे काय घडणार, आजच्या भागात हे सगळं पाहायला मिळणार आहे. रितेश देशमुखच्या ‘लयभारी’ स्टाईलमध्ये सुरू झालेला हा सीझन आता हळूहळू ‘डेंजर’ वळण घेऊ लागला आहे.
तसेच ‘बिग बॉस’ च्या नव्या सीझनमध्ये प्रभु शेळके उर्फ डॉन, अनुश्री माने, राकेश बापट, रोहन भजनकर, दिव्या शिंदे, नृत्यांगना राधा पाटील, ओमकार राऊत, विशाल कोटियन, दीपाली सय्यद,, सागर कारंडे, तन्वी कोलते, सचिन कुमावत, सोनाली राऊत, आयुष संजीव, रुचिता जामदार आणि करण सोनावणे हे सगळे स्पर्धक बिग बॉसच्या नव्या भागात दिसत आहेत.






