(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका “कमळी” मधील कमळीचा वाढदिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी तारिणी आणि निंगी यांनी एक अनोख सरप्राईझ प्लॅन केल. कमळीचे डोळे झाकून तिला महाराष्ट्रातील पाहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात नेल गेल आणि जेव्हा तिचे डोळे उघडले, तेव्हा कमळीचा आनंद तिच्या पाणावलेल्या डोळ्यात व्यक्त होत होता. मंदिरात पोहोचल्यावर कमळीने महाराजांचे दर्शन आणि आशिर्वाद घेतला आणि भावनिक होऊन आपल्या मनातील कृतज्ञता व्यक्त केली. या खास प्रसंगी कमळीने मंदिरात आलेल्या शाळेतील मुलांसमोर भाषण केलं आणि शिवस्तुती गेली. कमळीने महाराजांच्या शिकवणींना आपल्या दैनंदिन जीवनात अंगिकारावे आणि त्यांच्या मूल्यांचे पालन करावे असे म्हणत मुलांना प्रोत्साहित केल. या खास दिवसाचा उत्साह आणखी वाढवण्यासाठी बंड्या आणि ऋषी सर सुद्धा ह्या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम अधिक संस्मरणीय बनवला.
कमळीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या ‘विजया बाबर’ हिने या अनुभवाबद्दल सांगितले की, “मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात प्रथमच भेट देण्याची संधी मिळाली. कमळीच्या भावनेत मिसळून मी ही महाराजांचे आशीर्वाद घेतला. हा माझ्यासाठी एक अद्वितीय अनुभव होता.”
आपली ऐतिहासिक मूल्ये, संस्कार आणि आदर्श जीवन पद्धती आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकार करणे किती महत्त्वाचे आहे हे कमळीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मालिकेच्या चाहत्यांना एक सुंदर संदेशही दिला.
कमळी” ही झी मराठीवरील एक लोकप्रिय मराठी मालिका आहे, जिने प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा मिळवली आहे. या मालिकेत मुख्य पात्र कमळी नावाची एक उत्साही आणि धाडसी मुलगी आहे, जिने शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती करण्याचे स्वप्न पाहिलेले आहे. तिचा संघर्ष आणि सामाजिक भेदभाव, अडचणी यांचा सामना करत ती आपले स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करते, हे या मालिकेचे मुख्य कथानक आहे. मालिकेतील प्रमुख कलाकारांमध्ये विजया बाबर मुख्य भूमिकेत आहे, तर निखिल दामले आणि केतकी कुलकर्णी यांचे महत्त्वाचे पात्र आहेत.






