(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी अभिनेत्री गिरजा ओक सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. सध्या ही अभिनेत्री ट्विटर वर ट्रेंड करत आहे. अभिनेत्री गिरिजा ओकची ट्विटरवर सर्वाधिक चर्चा होत आहे. अभिनेत्रीची चाहते देखील या बातमीमुळे आनंदी झाले आहे. मालिका, चित्रपट, नाटक, ओटीटी वरून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलेली अभिनेत्री गिरिजा ओक ही “न्यू नॅशनल क्रश” होताना दिसतेय.
इंटरनेटवर कोणीही एका रात्रीत सेन्सेशन बनू शकते आणि आता निळ्या साडीतील एक महिला चर्चेत आहे. अनेक लोक ती कोण आहे हे जाणून घेण्यास उत्सुक होते आणि खरं तर अनेक यूजर्सनी हा फोटो पोस्ट केले आणि ही अभिनेत्री कोण आहे? आणि ती का ट्रेन करत आहे? असे प्रश्न विचारत आहेत. त्यानंतर यूजर्सनी सोशल मीडिया वर चौकशी सुरू केली. तेव्हा कळले की ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणतीही नसून गिरिजा ओक आहे. मराठी, हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये देखील गिरिजा ने आजवर काम केल आहे.
गिरिजाचा निळ्या रंगाच्या साडी मधला फोटो इंटरनेट तुफान व्हायरल होतोय आणि प्रेक्षक फॅन्स यांनी ती न्यू नॅशनल क्रश आहे असं देखील जाहीरपणे सांगितलं आहे. तिच्या सोशल मीडिया वरच्या फोटोजने तिने प्रेक्षकांचं कायम लक्ष वेधून घेतलं आहे तिने आजवर अनेक दर्जेदार प्रोजेक्ट्स मध्ये काम सुद्धा केलं आहे.
‘होय मी जय भीमवाली…’ ’या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचे बेधडक विधान, सोशल मीडियावर चर्चेचे तुफान
तिचे सौंदर्य आणि अभिनयशैली तसेच व्यक्तिमत्त्व चाहत्यांना वेड लावतंय. यामुळे सध्या तिला सोशल मीडियावर ‘नॅशनल क्रश’ ही पदवी मिळालीय. तिची साधी आणि आकर्षक छबी तरुणाईला भुरळ घालतेय आहे. येणाऱ्या काळात गिरिजा नक्कीच काहीतरी खास घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
अभिनेत्री बद्दल सांगायचं झालं तर, ती नुकतीच इन्स्पेक्टर झेंडे या वेब सिरीज मध्ये बॉलीवूड अभिनेते मनोज बाजपेयी यांच्यासोबत दिसली. ही सिरीज देखील सोशल मीडियावर चर्चेत राहिली. आता अभिनेत्रीचे नवनवीन प्रोजेक्ट जाणून घेण्यासाठी आणि तिच्या नवनवीन भूमिका पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.






