(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
‘नवरा माझा नवसाचा 2’ हा चित्रपट बऱ्याच वर्षानंतर चाहत्यांच्या भेटीस आला असून, तो नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. आणि चित्रपटाने सुपरहिट ब्लॉकबस्टर कमाई केली. स्वप्नील जोशी, सुप्रिया- सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, हेमल इंगळे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकलं आहे. दमदार कमाई करून सगळीकडे हाऊसफुल्ल ठरलेला “नवरा माझा नवसाचा 2″ प्रेक्षकांच्या पसंतीस तर पडला पण अनेक बड्या स्टार्सनी या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक देखील केले आहे.
अभिनेता – दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी स्वप्नीलला त्यांचा सोशल मीडिया वरून खास शुभेच्छा देऊन चित्रपटाच आणि त्याच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. प्रसाद ओकने लिहिले की, ” स्वप्नील जोशी ‘नवरा माझा नवसाचा 2’ बंपर विक इंड अभिनंदन भावा” अश्या आपुलकीच्या शब्दात एका कलाकाराने दुसऱ्या कलाकार मित्राचं कौतुक करून त्याचा चित्रपटाला खास शुभेच्छा दिल्या आहेत. आणि हे पाहून चाहत्यांना देखील आनंद झाला आहे. तसेच स्वप्नील जोशी ने देखील दिग्दर्शक- अभिनेता प्रसाद ओक यांच्या आगामी “धर्मवीर 2” या आगामी चित्रपटासाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपट विश्वात एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराची पाठ थोपटून शुभेच्छा तर दिल्या पण आपल्या मित्राच्या चित्रपटासाठी एका कलाकाराने त्याला देखील खास शुभेच्छा देताना हे दोघेही दिसले आहेत.
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
हे देखील वाचा- कृती खरबंदाचे डिजीटल डिटॉक्स, व्यक्त केली भावना प्रत्येकाने समजून घ्यावीच!
स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक हे दोघेही मराठी इंडस्ट्रीमधील अत्यंत्य आघाडीचे कलाकार आहेत. या दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहेत. आणि आता या पोस्टद्वारे स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक हे अभिनयाच्या पलीकडे जाऊन एकमेकांचे खास मित्र देखील आहेत हे स्पष्ट दिसून आले. आहे. वेगवेगळ्या विषयांवर यावर्षात अनेक दमदार चित्रपट येत असले तरी आता स्वप्नील आणि प्रसाद ही जोडी प्रेक्षकांना ऑन स्क्रीन एकत्र बघायला नक्कीच आवडेल यात शंका नाही.