(फोटो सौजन्य - Instagram)
प्रसिद्ध अभिनेता,दिग्दर्शक आणि पॉवरहाऊस कलाकार म्हणजे प्रसाद ओक यांना यंदाचा प्रतिष्ठित निळू फुले कृतज्ञता सन्मान २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दिग्गज अभिनेते असलेल्या निळू फुले यांच्या नावावर असलेला हा सन्मान मराठी चित्रपट, रंगभूमी आणि समाजावर त्यांच्या कार्य आणि सामाजिक संवेदनशीलतेद्वारे महत्त्वपूर्ण प्रभाव पाडणाऱ्या कलाकारांना दिला जातो. आणि अभिनेत्याचे हेच सिनेमासृष्टीचे कार्य पाहून अभिनेत्याला मान देण्यात आला आहे.
ADHD Disorder म्हणजे काय? ज्याला झुंज देत आहे ‘हा’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेता, स्वतःच केला खुलासा!
कॅमेऱ्यासमोर आणि मागे त्यांच्या बहुमुखी प्रतिभेसाठी आणि प्रभावी कथाकथनासाठी ओळखले जाणारे प्रसाद ओक यांनी मराठी मनोरंजनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘कच्चा लिंबू’ आणि ‘धर्मवीर’ सारख्या चित्रपटांमधील दमदार अभिनयापासून ते ‘हिरकणी’ सारख्या प्रशंसित प्रकल्पांमधील दिग्दर्शनापर्यंत प्रसाद ओकने त्याच्या कामाची खास प्रतिभा दाखवली आहे. चाहत्यांना त्याचे प्रेक्षक चित्रपट खूप आवडले आहेत. अभिनेत्याची प्रत्येक भूमिका ही मनाला भिडणारी आहे.
या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना प्रसाद ओक म्हणाला की, “निळू फुलेंसारख्या दिग्गजाच्या नावावर असलेला पुरस्कार स्वीकारणे हा केवळ सन्मान नाही तर तो एक भावनिक क्षण आहे. त्यांच्या वारशाने मला नेहमीच अर्थपूर्ण भूमिका आणि लोकांशी बोलणाऱ्या कथा निवडण्याची प्रेरणा दिली आहे. हा पुरस्कार मिळणं हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण असणार आहे” असे अभिनेत्याने म्हटले आहे. तसेच अभिनेत्याने ही आनंदाची बातमी शेअर करत लिहिले, ‘कळवण्यास अत्यंत आनंद होतोय…की..यंदाचा “निळू फुले कृतज्ञता सन्मान” हा पुरस्कार मला जाहीर झाला आहे.’
हा पुरस्कार सोहळा ७ जून २०२५ रोजी पुण्यात पार पडणार आहे. चित्रपट, नाट्य आणि साहित्य जगतातील प्रमुख व्यक्ती या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे समजले आहे. या सन्मानासह प्रसाद ओक अर्थपूर्ण आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक कलांचा वारसा पुढे नेणाऱ्या कलाकारांच्या प्रतिष्ठित यादीत सामील झाला आहे. येणाऱ्या काळात प्रसाद ओक अनेक वैविध्यपूर्ण कलाकृती प्रेक्षकांचा भेटीला घेऊन येणार आहेत. तसेच अभिनेत्याने आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.