झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका सध्या घरघरात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेतील नायक असो किंवा खलनायक प्रेक्षकांचा या सगळ्या कलाकारांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता हर्षदा खानविलकरने मालिकेतील खलनायक जयंतचं भरभरुन कौतुक केलं आहे. मालिकेतील जयंत म्हणजे लक्ष्मी आणि श्रीनिवास यांची मुलगी जान्हवीचा नवरा. जयंतच्य़ा विक्षिप्त आणि विकृत वागण्याने लक्ष्मी आणि निवास यांच्याबरोबर संपूर्ण कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आजीला देखील मारण्याचा प्रयत्न जयंतने केला. एवढचं नाही तर व्यंकी हा देखील जयंतचा भाऊ असून त्यानेत व्यंकीला मारण्याचा देखील प्रयत्न केला होता.
असा हा विकृत खलनायक असलेला जयंतला प्रेक्षकांनी आजवक खूप शिव्या घातल्या आहेत अनेकजण त्याचा राग राग देखील करत आहेत याबाबतच मालिकेतील लक्ष्मी म्हणजेच अभिनेत्री हर्षदा खानविलकर हिने जयंतचं कौतुक केलं आहे. झी मराठी पुरस्कार सोहळा लवकर पार पडणार आहे. या पुरस्काराच्या नामांकन सोहळ्याला कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे.
यावेळी हर्षदा खानविलकरने मालिकेतील जयंत म्हणजेच मेघन जाधवचं भरभरुन कौतुक केलं आहे. मालिकेतील नकारात्मक भुमिकेच्या अगदी विरुद्ध मेघन आहे. तो खूप जबाबदार मुलगा आणि गुणी अभिनेता आहे. एक माणूस म्हणून तो चांगला मुलगा आहे. अभिनेत्री हर्षदा खानविलकर पुढे असंही म्हणाली की, तो त्याच्या आई-बाबांचा मुलगा आहे. खूप जबाबदार मुलगा आहे. त्याच्या पुतण्यांमध्ये रमणारा मुलगा आहे. खऱ्या आयुष्यात तो माणूस खूप चांगला आहे आणि अत्यंत कमाल अशी भूमिका त्याला मिळाली आहे, जी तो लीलया वठवतोय. त्यामुळे लोकांना वाटतंय की, तो खऱ्या आयुष्यातही तसाच असेल बहुतेक. मला वाटतं यासाठी आपण सगळ्यांनीच त्याचं कौतुक केलं पाहिजे.”