शुक्रवारी सकाळी मनोरंजन सृष्टीतून एक दुख:द बातमी समोर आली होती. मॅाडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचं निधन झाल्याचं सांगण्यात येत होतं. आता शनिवारी सकाळी पूनम जीवंत असल्याची माहिती समोर आली. तिनं स्वत: इन्स्टावर व्हिडिओ अपलोड करत मृत्यूच्या बातमी खोटी असल्याच सांगितलं. यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहे. पूनमची मैत्रीण अभिनेत्री राखी सावंतने (Rakhi Sawant On Poonam Panday) सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाली राखी सावंत बघा.
[read_also content=”‘हे खूप लाजिरवाणं…’ मृत्यूची बातमी खोटी दिल्यानं फॅन्सनं पूनमला चांगलच सुनावलं! https://www.navarashtra.com/movies/social-media-users-reaction-on-poonam-panday-fake-death-news-nrps-504219.html”]
पूनम पांडेच्या निधनाचं वृत्त ही अफवा असल्याचं समोर आल्यानंतर आता बॉलिवूडची ड्रामाक्वीन राखी सावंतची (Rakhi Sawant) प्रतिक्रिया समोर आली राखी म्हणाली,”पूनम तू तर आम्हाला मोठा धक्काच दिला होतास. तू वेडी आहेस का? स्वत:च्या मरणाचा पब्लिसिटी स्टंट कोण करतं? माध्यमं, चाहतावर्ग यांच्यासह माझ्याही भावनांचा तू खेळ केलास. आणि आता जिवंत असल्याचा व्हिडीओ बनवला आहेस. नक्की सुरू काय आहे तुझं? तुझ्या निधनाने मी दु:खी झाले होते”.
पूनम पांडेच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर एकीकडे चाहत्यांना मोठा धक्का बसला तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी हा पब्लिसिटी स्टंट आहे, अशी शक्यता वर्तवली होती. त्यांचा संशय आता खरा ठरला. लोक म्हणू लागले होते की हा नक्कीच पब्लिसिटी स्टंट आहे. लोक विचारत होते की तिचा मृत्यू कसा आणि कधी झाला. तिचा मृतदेह कुठे आहे? तिला कॅन्सर झाला तर कोणालाच का कळले नाही? असे प्रश्न नेटकऱ्यांना पडले होते पण आता या सगळ्या प्रश्नांना पूर्णविराम मिळाला. पण पूनमला आता सगळ्यांच्या रोषाला सामोर जावं लागत आहे.
एका यूजरने लिहिले की, हा एक वाईट विनोद आहे, असं पब्लिसिटी स्टंट कोण करतो?
एका यूजरने लिहिले- लोक म्हणत आहेत पूनम पांडे जिवंत आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने इतक्या लवकर कोणीही मरत नाही. दुसरं म्हणजे ती कानपूरमध्ये नव्हती. जर तो स्टंट असेल तर तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील.