Rashmika Mandanna Reveals First Reaction On Working With 31 Years Older Salman Khan In Sikander
बॉलिवूडचा ‘भाईजान’ अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘सिकंदर’चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत सलमान खानसोबतच अभिनेत्री रश्मिका मंदान्ना देखील आहे. सलमान आणि रश्मिका पहिल्यांदाच ‘सिकंदर’चित्रपटाच्या माध्यमातून एकत्रित स्क्रिन शेअर करणार आहेत. दोघांनाही एकत्रित पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. जरीही दोघंही पहिल्यांदाच एकत्र काम करणार असले तरीही त्या दोघांच्याही वयात बरंच अंतर आहे. एकीकडे सलमान 59 वर्षांचा आहे तर रश्मिका 28 वर्षांची आहे. प्रमोशन दरम्यान, रश्मिकाला जेव्हा सलमान खानसोबत चित्रपटामध्ये काम करण्याची ऑफर आली, तेव्हा तिची पहिली रिॲक्शन काय होती ? असा प्रश्न विचारण्यात आला.
श्रद्धा आर्यने स्वतःच्या जुळ्या मुलांचा गोंडस फोटो केला शेअर, काही मिनिटांतच झाला इंटरनेटवर व्हायरल!
आज तक आणि इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत रश्मिकाने ‘सिकंदर’चित्रपटात सलमानसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. सलमान खानसोबत काम करण्याचा अनुभव शेअर करताना रश्मिका म्हणाली की, “जेव्हा मला ‘सिकंदर’साठी पहिल्यांदाच फोन आला तेव्हा तो क्षण माझ्यासाठी फारच आश्चर्यकारक होता. कारण पूर्वी मला सेलिब्रिटी व्हायचे नव्हते. पण तरीही मी कशी बशी अभिनय क्षेत्रात आली. या टप्प्यावर पोहोचल्यावर, जेव्हा तुम्हाला सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळते, तेव्हा एक सेलिब्रिटी म्हणून आपल्याला असे वाटते की आपण कुठे तरी चांगलं काम केले आहे, म्हणूनच आपल्या नशिबात इतकी मोठी संधी मिळालीये. कारण जर मी ते केले नसते, तर मला ही संधी मिळाली नसती.”
९ वर्षाची नाराजी अखेर संपली; सलमान आणि अरिजीत आले एकत्र, वादाचं नेमकं कारण काय ??
‘सिकंदर’ करण्याबद्दल रश्मिका म्हणाली, “जेव्हा मला ‘सिकंदर’ साठी फोन आला तेव्हा मला माहित होते की मला व्यावसायिक चित्रपट करायचे आहेत, पण मला व्यावसायिक चित्रपटांमध्ये अभिनेत्रीच्या भूमिकेलाही तितकेच महत्व असणाऱ्या चित्रपटांमध्ये मला काम करायचे होते. मला व्यावसायिक चित्रपटांमध्ये भावना हव्या होत्या. म्हणूनच या चित्रपटाने मला आकर्षित केले. साजिद सरांनी मला चित्रपटासाठी सर्वात आधी बोलावले. त्यांनी मला सांगितले की, तुझ्यासाठी काहीतरी खास गोष्ट आहे. त्यावेळी मला चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल फारशी माहिती नव्हती. मी त्यांच्याकडे स्क्रिप्ट वाचण्याची मागणी केली होती. शिवाय त्याचवेळी मी दुसऱ्या प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यग्र होते.”
ओटीटीवर नाट्यरसिकांना मिळणार नाट्यखजिना…
“जेव्हा मला पहिल्यांदाच चित्रपटाचं कथानक सांगितलं, तेव्हा मी चित्रपटाच्या कथेच्या प्रेमात पडले.’ मग मी त्यांना स्टारकास्टबद्दल विचारले. जेव्हा त्यांनी मला सलमान खानचे नाव सांगितले, तेव्हा मी स्वतःलाच प्रश्न केला की, खरोखर हा चित्रपट माझ्या पदरात कसा पडला.” रश्मिकाने सलमानचे मुलाखती दरम्यान खूप कौतुक केले. रश्मिकाने सांगितले की, “सेटवर सलमान सरांनी माझी खूप काळजी घेतली. सलमान सर नेहमी मला हे खा, ते खा, ते खालल्लस का ? हे खालल्लंस का ? असं विचारत राहायचे किंवा काहीतरी पी… एक अभिनेता म्हणून सलमान सर जितके बेस्ट आहेत, त्याहून जास्त सलमान सर एक माणूस म्हणून बेस्ट आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला एक चांगला माणूस बनवतात. माझ्यासाठी, कलाकारांपेक्षा माणसं जास्त महत्त्वाची आहेत. या गोष्टींमध्ये कोणतीही खोटेपणा नाही. हा माणसाचा चांगुलपणा आहे.”
दरम्यान, ईदच्या दिवशी प्रदर्शित होणारा ‘सिकंदर’ चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला जेव्हापासून सुरुवात झालीये तेव्हापासून बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करू शकेल, असा अंदाज सोशल मीडियावर चाहते वर्तवत आहेत. ईदच्या दिवशी रिलीज होणाऱ्या ‘सिकंदर’ चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवालांनी केली आहे. या चित्रपटात सलमान खान पहिल्यांदाच दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत पाहायला मिळणार आहे. ‘सिकंदर’ चित्रपटात सलमान, रश्मिकाव्यतिरिक्त काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर झळकणार आहे. तसेच ‘बाहुबली ‘चित्रपटातील कटप्पा म्हणजे अभिनेता सत्यराज खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.