Ye Re Ye Re Paisa 3 Title Song Released On Social Media
‘येरे येरे पैसा’ आणि ‘येरे येरे पैसा २’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता प्रेक्षकांच्या मनोरंजनाची ट्रिपल डोस घेऊन ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच एक भव्य सोहळ्यात लाँच करण्यात आले. विशेष म्हणजे या सोहळ्याला बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि महेश मांजरेकर याची विशेष उपस्थिती होती, ज्यामुळे कार्यक्रमाचे आकर्षण अधिकच वाढले. या वेळी सलमान खान याने गाण्याचे कौतुक करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.
बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आराध्या पटेल गाजवणार छोटा पडदा, मालिकेचा प्रोमो रिलीज
या जबरदस्त गाण्यात वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजाने अधिकच रंगत आणली असून अमितराज यांनी संगीताला उर्जा आणि झिंग दिली आहे. या चित्रपटातील इतर गाण्यांना पंकज पडघन यांचे संगीत लाभले आहे. तर हे गाणे सचिन पाठक (यो) यांनी लिहिले आहे. ‘येरे येरे पैसा ३’ या गाण्यातील सर्व कलाकारांची एनर्जी पाहून यंदाचा भाग आणखीन धमाल आणि मनोरंजनाने भरलेला असणार, याबद्दल कोणतीही शंका नाही.
या गाण्याबद्दल आणि चित्रपटाबद्दल सलमान खान म्हणतो, “हे गाणे अप्रतिम झाले आहे. गाण्यावरूनच चित्रपट काय जबरदस्त असेल याचा अंदाज येतोय. चित्रपटाची संपूर्ण टीम जबरदस्त आहे. या सगळ्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि या चित्रपटाच्या चौथ्या भागात मला सहभागी व्हायला नक्कीच आवडेल.”
‘एक राधा एक मीरा’नंतर मृण्मयी देशपांडेचा नवीन सिनेमा, ‘मनातली’टीमसोबत करणार कल्ला
या म्युजिक लाँच कार्यक्रमाबद्दल बोलताना दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, ” ‘येरे येरे पैसा ३’ ही केवळ फ्रँचाईजी नाही, तर प्रेक्षकांशी आमचा भावनिक संबंध आहे. या भागात अधिक मोठं, धडाकेबाज आणि थरारक काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे.”
निर्माते अमेय विनोद खोपकर आणि निनाद बत्तीन म्हणाले, “सलमान खानने वेळात वेळ काढून आमच्यासाठी या सोहळ्याला उपस्थित राहाणं, ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या टायटल साँगच्या माध्यमातून चित्रपटाची धमाल झलक प्रेक्षकांसमोर आली आहे, आता चित्रपटगृहात पूर्ण धमाका अनुभवायला मिळेल.”
धर्मा प्रॉडक्शन्सचे अपूर्व मेहता म्हणाले, “मराठी सिनेमाची गुणवत्ता आणि व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. ‘येरे येरे पैसा ३’ हा एक परिपूर्ण मनोरंजनपट असून आम्ही याचा भाग झाल्याचा आनंद आहे.”
धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स निर्मित या चित्रपटाची सहनिर्मिती वर्डविझार्ड एंटरटेनमेंटने केली आहे. सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन, गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ हे चित्रपटाचे निर्माते असून सौरभ लालवाणी सहनिर्माते आहेत.
अनुष्का नाही, ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री होती विराट कोहलीचं पहिलं क्रश; स्वतः केला होता खुलासा!
चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले आहे. कलाकारांच्या चमकदार यादीत संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांच्यासह आणखी काही चर्चित चेहरे दिसणार आहेत. ‘येरे येरे पैसा ३’चे एनर्जेटिक टायटल साँग पाहून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.