Did Deepika Padukone Paid Rs 73 Lakh To Receive Star On Hollywood Walk Of Fame Know Details
सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिला विशेष ओळखीची गरज नाही. २००७ साली रिलीज झालेल्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणाऱ्या दीपिकाने आपल्या सिनेकरियरमध्ये बॉलिवूडला अनेक सुपरडुपर हिट सिनेमे दिले आहेत. ‘बाजीराव मस्तानी’, ‘हॅप्पी न्यू इयर’, ‘पद्मावत’, ‘यह जवनी है दिवानी’, ‘पिकू’, ‘पठाण’, ‘तमाशा’, ‘कल्की २८९८ एडी’ सारख्या अनेक हिट चित्रपटात तिने काम केले आहे. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या दीपिकाच्या शिरपेचात आता एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
“हीच माऊलींची सेवा…” अनाथ- आदिवासी मुलांसाठी अभिनेत्याचा ‘एक हात मदतीसाठी’; चाहत्यांना केलं आवाहन
दीपिका आता ‘हॉलिवूड वॉक ऑफ फेम’मध्ये स्टार मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान अभिनेत्रीला हा सन्मान मिळाला आहे. ‘हॉलिवूड वॉक ऑफ कॉमर्स’ने २०२६ या वर्षासाठी मोशन पिक्चर्स श्रेणीतील ‘हॉलिवूड वॉक ऑफ फेम’मध्ये स्टार देऊन सन्मानित केले आहे. या संबंधितची माहिती ‘हॉलिवूड वॉक ऑफ कॉमर्स’ने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून दीपिकाच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. पण, ‘हॉलिवूड वॉक ऑफ फेम’मध्ये स्टार मिळवणाऱ्याला दीपिकाला लाखो रुपये मोजावे लागले आहे.
या प्रसिद्ध ‘हॉलिवूड वॉक ऑफ फेम’मध्ये स्थान मिळवणे ही कोणत्याही कलाकारासाठी मोठी गोष्ट मानली जाते. फॅन्स लोकं आपल्या आवडत्या कलाकाराला स्टार मिळावा, यासाठी ‘हॉलिवूड वॉक ऑफ फेम’मध्ये त्या कलाकाराचे नाव सुचवू शकते. पण, त्या कलाकाराला नामांकन देताना त्या कलाकार अथवा त्याच्या मॅनेजमेंट टीमची परवानगी असलेले करारपत्र सादर करावे लागते. जर कलाकार किवा त्याच्या टीमचे करारपत्र नसेल, तर समिती तो अर्ज स्वीकारत नाही. त्या कलाकाराची निवड झाल्यानंतर त्या कलाकाराला किंवा त्या कलाकाराच्या प्रायोजकाला हॉलीवूड वॉक ऑफ फेमच्या स्टारसाठी एक रक्कम भरावी लागते.
आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ची पहिली झलक पाहिली का? रिलीज डेट ठरली
भरावी लागणारी ही रक्कम ८५ हजार डॉलर्स म्हणजेच ७३ लाख रुपये इतकी आहे. त्याशिवाय ॲप्लिकेशन फॉर्म मिळविण्यासाठी २७५ डॉलर्स म्हणजेच २३ हजार ५३० रुपये भरावे लागतात. प्रत्येक वेळी अर्ज करताना ही इतकी रक्कम भरावी लागते. आता, हॉलीवूड वॉक ऑफ फेमसाठी दीपिकाने स्वतः अर्ज केला होता की इतर कोणी, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. ‘हॉलिवूड वॉक ऑफ फेम’हा लॉस एंजेलिसमधील हॉलिवूड बुलेव्हार्डवर बांधलेला एक खास पदपथ आहे. आतापर्यंत २७०० हून अधिक स्टार्सची नावे त्यात नोंदवली गेली आहेत. येथे प्रत्येक स्टार एका प्रसिद्ध कलाकाराला समर्पित आहे. ‘हॉलिवूड वॉक ऑफ फेम’मध्ये नाव मिळवणे हा एक मोठा सन्मान मानला जातो आणि ज्यांनी आपल्या कलेने चाहत्यांची मने जिंकली आहेत त्यांनाच त्यात स्थान मिळते.