मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना (फोटो- सोशल मिडिया)
केंद्र सरकारने धर्मेद्र प्रधान यांना पदावरून हटवले आहे. विद्यार्थ्यांनी सरकारसमोर तीन प्रमुख अटी ठेवल्या होत्या. यात धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख अट होती. सरकारसोबत काल च्या बैठकीनंतर आज दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सरकारला अल्टीमेटम देण्यात आला होता. आज पुन्हा बैठक होणार होती. पण आजच्या बैठकीपुर्वीच सरकारने धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा घेत त्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यातच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.
Dharmendra Pradhan Resign: विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश! धर्मेंंद्र प्रधान यांचा राजीनामा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना केंद्र सरकारने पदावरून हटवले आहे. त्यानंतर सीजेपीने एकच जल्लोष केला आहे. अभिजीत दिपके यांनी यावर भाष्य केले आहे. मात्र त्यातच आता राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसून येत आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तातडीने दिल्लीला रवाना झाल्याचे समजते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काही बदल पाहायला मिळणार का याची चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, नाहीतर आणखी मोठं आंदोलन; अभिजीत दिपकेंचा केंद्र सरकारला इशारा
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आषाढी वारीनिमित पंढरपूर दौऱ्यावर होते. मात्र या सर्व वेगवान घडामोडी पाहता मुख्यमंत्री फडणवीस तातडीने सोलापूरवरूनच दिल्लीला रवाना झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली जाणार की अन्य काही बदल केले जाणार हे येणारया काळातच स्पष्ट होणार आहे. मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत घडामोडी वेगवान झाल्याचे पाहायला मिळत आहे.






