मनमाडच्या ठाकरे गटाच्या उमेदवा नितीन वाघमारेचे आकस्मिक निधन झाले आहे (फोटो - सोशल मीडिया)
Maharashtra Politics : नाशिक : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणूका होणार आहेत. यामुळे जोरदार राजकीय वाद निर्माण झाला असून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रभाग क्रमांक १०-अ मधील उमेदवार नितीन वाघमारे यांचे आकस्मिक निधन झाले.
निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचे निधन झाले आहे. मनमाड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १०-अ मध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. गायकवाड चौक परिसरातील रहिवासी आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नितीन वाघमारे (वय अंदाजे ५०) यांचे सोमवारी रात्री अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नितीन वाघमारे हे मनमाडमधील ज्येष्ठ आणि सक्रिय शिवसैनिक म्हणून परिचित होते. मात्र त्यांच्या जाण्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ठाकरे गटाचे नेते आणि उमेदवार नितीन वाघमारे यांचे निधन झाल्यामुळे मनमाडच्या राजकारणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. मनमाडमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे, तसेच निवडणुकीला देखील रंगत आली होती. मनमाड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 9 उमेदवार तर नगरसेवक 33 जागांसाठी 215 उमेदवार हे रिंगणात उतरले आहे. काँग्रेसने 9 जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर बहुजन समाज पक्ष, वंचित, अपक्ष यांच्यासह जवळपास सर्वच प्रभागांत बहुरंगी लढत होत आहे. नितीन वाघमारे यांच्या निधनाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असला, तरी मनमाडच्या राजकीय वातावरणात निवडणुकीची धामधूम कायम आहे. आगामी काही दिवस निवडणुकीचे निकाल कोणाच्या बाजूने झुकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एकूण 16 प्रभागांत सर्वत्र तिरंगी-चौरंगी लढत
तब्बल 9 वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीत तरुण उमेदवारांचा मोठा भरणा झाला आहे. गल्लीगल्लीत प्रचाराला वेग आला असून मतदारांशी थेट संवाद साधला जात आहे. काही जुन्या-जाणत्या माजी नगरसेवकांना मात्र जनतेकडून रोषालाही सामोरे जावे लागत आहे. भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी बोगेश पाटील , शिवसेना (उबाठा) नगराध्यक्ष पदासाठी प्रवीण नाईक तर अजित पवार गट राष्ट्रवादीकडून रविंद्र घोडेस्वार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर शरद पवार गट राष्ट्रवादीकडे शुभम चुनियान, वंचित बहुजन आघाडीकडून नितीन जाधव, बहुजन समाज पक्षाकडून प्रवीण पगारे आणि अपक्ष म्हणून राजू निरभवणे, निमदेव हिरे आणि अन्य उमेदवार हे रिंगणात उतरले आहेत.






