आणीबाणीत ज्यांनी वर्तमानपत्र बंद पाडलं त्यांचा मुलगा आज भाजपात; शंकररावांवरून संजय राऊतांचा पलटवार
मुंबई : राज्यामध्ये गुढीपाडवाच्या सणाचा मोठा उत्साह दिसून येत आहे. सकाळपासून राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर अशा प्रमुख शहरांमध्ये शोभायात्रा काढण्यात आल्या आहेत. यामध्ये मराठी संस्कृतीचे दर्शन होत आहे. ढोल-ताशा वादन, भगवे झेंडे आणि रथयात्राच्या माध्यमांतून सण साजरा केला जात आहे. राजकीय नेते देखील सणउत्सवामध्ये सामील झाले आहेत. खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर चर्चा केली. तसेच राज ठाकरे यांना सल्ला देखील दिला आहे.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने संध्याकाळी राज ठाकरे हे कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी संवाद साधत असतात. यंदा देखील राज ठाकरे कोणत्या मुद्द्यावर भाष्य करणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. यावरुन संजय राऊत यांनी त्यांना लक्ष केले आहे. खासदार राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांचा मनसे पक्ष हा भाजपचा एकप्रकारे मित्रपक्ष आहे. त्यामुळे त्यांचा हा भाजपच्या मित्रपक्षाचा मेळावा आहे. त्यांची भूमिका भाजपला धरून आहे. त्यांच्या घरी भाजपचे लोक चहापाणाला येतात. उद्याच्या महापालिका निवडणुकीत भाजपसाठी काय भूमिका घेता येईल हे ते मेळाव्यातून मांडतील, असा टोला खासदार राऊत यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊन देखील लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता न दिल्यामुळे विरोधक निशाणा साधत आहेत. संजय राऊत यांनी देखील राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, अजित पवार, फडणवीस आणि शिंदे यांची निवडणुकीपूर्वीची भाषा पूर्णपणे वेगळी होती. कर्जमाफी, शेतकरी आणि लाडक्या बहिणींबाबत बोलताना करणारच असं बोलत होते. आता अजितदादांनी हातवर केले आहेत. अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे. कर्जमाफी देऊ शकत नाहीत तर त्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला पाहिजे. एकनाथ शिंदेंनी जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही तोपर्यंत देवगिरी बंगल्याबाहेर उपोषणाला बसावं, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्राचे वातावरण शिंदे व त्यांचे लोक बिघडवत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांना लोकांना दाखवायचे आहे. त्यामुळे ते कायद्याची भाषा करत नाहीत. म्हणून कामराने शिंदेंची माफी मागावी अशी अलोकशाही भाषा ते करतात. देवेंद्र फडणवीस हे अभिव्याक्ती स्वातंत्र्य वगैरे मानायला तयार नाहीत असेच दिसते. कंगना राणावत या महिलेच्या बेताल वक्तव्यांना पाठिंबा देताना त्यांना हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवले, पण कुणाल कामरा प्रकरणात ते स्वातंत्र्य मानत नाहीत. कंगना राणावतने मुंबईची तुलना तेव्हा पाकिस्तानशी केली म्हणून लोक भडकले. पण फडणवीस कंगनाच्या समर्थनासाठी उत्तरले. हा दुटप्पीपणा आहे. नरेंद्र मोदी यांची एकाधिकारशाही, एकनाथ शिदिची झुंडशाही व फडणवीस यांची बनवाबनवी यांच्या ठिकरया कुणाल कामराच्या दौड मिनिटाच्या व्यंगकाव्याने उडवल्या.