Jawali News: जावळीच्या सुपुत्रावर मोठी जबाबदारी! अंकुश कदम यांची शिवसेना प्रवक्तेपदी नियुक्ती
नवी मुंबईमध्ये शिवसेना पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी अंकुश कदम यांनी सातत्याने काम केले आहे. संपर्कप्रमुख म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना एकत्र ठेवत पक्षवाढीसाठी प्रभावी नियोजन केले. विशेषतः नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यात आणि शिवसेनेला यश मिळवून देण्यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून अंकुश कदम यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे पक्षाची अधिकृत भूमिका ठामपणे आणि प्रभावीपणे जनतेसमोर मांडण्याचे महत्त्वाचे काम आता ते सांभाळणार आहेत.
राजकीय घडामोडींवर पक्षाची ठाम बाजू मांडणे, विविध विषयांवर माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट करणे आणि पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविणे या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि संघटन कौशल्याचा पक्षाला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास शिवसैनिकांकडून व्यक्त केला जात आहे.
‘बहुपत्नीत्वावर बंदी का नाही?’ सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला थेट सवाल, सरकारकडे मागितले उत्तर
जावळी तालुक्यातील सुपुत्रावर पक्षाने इतकी मोठी जबाबदारी सोपवल्यामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण असून शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांकडून अंकुश बाबा कदम यांच्यावर शुभेच्छांचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या निवडीमुळे जावळी तालुक्याच्या राजकीय क्षेत्रातही अभिमानाची भावना व्यक्त केली जात आहे.
“पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मझ्यावर जी जबाबदारी व जो विश्वास मझ्यावर दाखवला आहे.त्या विश्वासाने पक्ष शहरी तसेच ग्रामीण भागात मजबूत करण्यासाठी माझ्याकडून काम होईल.”
अंकुशबाबा कदम, शिवसेना प्रवक्ते






