अंतर्गत मतभेदांमुळे मुंबई अध्यक्षांच्या नावाचा सस्पेन्स कायम
Mumbai Politics: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकूच्या पार्श्वभूमीवर भाजपने दोन आठवड्यांपूर्वीच राज्यातील ५८ जिल्हाध्यक्षांची घोषणा केली. पण उरलेल्या २२ जिल्हाध्यक्षांची यादी मात्र स्थानिक मतभेदांमुळे रखडली होती. पण अनेक ठिकाणी तडजोडी करून आणि निवडणुकांची समीकरणे डोळ्यासमोर ठेवून निवडी जाहीर कऱण्यात आल्या, या घोषणेनंतरही अनेक ठिकाणांहून नाराजी व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे भाजपमधील हे नाराजीनाट्य दूर करण्याचे आव्हानही भाजपसमोर असणार आहे. पण त्याचवेळी महापालिका निवडणुका तोंडावर असतानाही मुंबईचा भाजप अध्यक्ष अद्याप ठरलेला नाही. एका माहितीनुसार भाजप अध्यक्षपदासाठी तीन नावांची चर्चा सुरू आहे, पण त्यावर अद्याप एकमत न झाल्यामुळे या निवडणुका रखडल्या आहेत.
दरम्यान, भाजपच्या पहिल्या टप्प्यातील जिल्हाध्यक्ष निवडीच्या घोषणेनंतर काही ठिकाणी नाराजी असल्याचेही समोर आले होते. पण हा विरोध कमी अधिक प्रमाणात असल्याने दुसऱ्या टप्प्यातील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करताना पुर्वीच्या चुकाही टाळण्यात आल्या. पक्षांतर्गत नाराजी दूर करून भाजपने निवडणुकीची समीकरणे साधत जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या. पण त्यानंतरही अनेक ठिकाणी या पदासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये नाराजीचा सुरू उमटताना दिसत आहे. त्यामुळे उरलेली नावे निश्चित करणअयासाठी स्थानिक नेते, आमदार-खासदार आणि प्रदेश पातळीवरली नेत्यांमध्ये चर्चा झाल्या. पण त्यानंतरही विरोध कायम असून मुंबईतील काही निवडींनाही विरोध करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.
Kalyan Crime Case: महिला अत्याचाराविरोधात पोलीस यंत्रणा सतर्क; 48 तासाच्या आत दाखल केले दोषारोपपत्र
दरम्यान, राज्यातील उर्वरित २२ जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यापूर्वी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण आणि पक्षाचे काही केंद्रीय नेते यांच्यात सविस्तर चर्चा झाली होती. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत जिल्हाध्यक्षांच्या निवडीबाबत सखोल चर्चा करून यादी अंतिम करण्यात आली. पण जिल्हाध्यक्षांच्या निवडीनंतरही काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. पक्षांतर्गत मतभेदही उघड होऊ लागले आहेत. विशेषतः मराठवाड्यातील बीड आणि लातूर ग्रामीण या जिल्हाध्यक्ष निवडीवरून मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना, भाजपने संघटनात्मक पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. नवीन नेतृत्वाची निवड अंतिम टप्प्यात आहे. राजकीयदृष्ट्या मुंबईसारख्या महत्त्वाच्या महानगरात भाजपच्या शहराध्यक्ष पदाची निवड ही केवळ संघटनात्मक नव्हे, तर राजकीयदृष्ट्याही अत्यंत निर्णायक मानली जाते. प्रचार, निवडणूक संचालन आणि स्थानिक निर्णय प्रक्रियेत अध्यक्षाची भूमिका महत्त्वाची असते. पण मुंबई भाजप जिल्हाध्यक्षांच्या निवडीच्या प्रक्रियेतच नाराजीनाट्य सुरू असल्यामुळे इच्छुकांच्या नावांची प्रक्रिया रखडली आहे. गटबाजी व अंतर्गत मतभेद यामुळे केंद्रीय नेतृत्व काहीसे संभ्रमात असल्याची चर्चा आहे.
शेख हसीनांवर ‘मानवतेविरुद्धच्या’ गुन्ह्याखाली आरोपपत्र दाखल; बांगलादेशी न्यायालयात आज होणार सुनावणी
सध्याचे भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे नवीन अध्यक्षपदाची निवड आवश्यक मानली जात आहे. भाजपचे केंद्रीय सह-संघटनमंत्री शिव प्रकाश आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार प्रवीण दरेकर, अमित साटम आणि अतुल भातखळकर या तीन नावांवर चर्चा झाल्याचे समजते.
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड आणखी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे भाजपकडून लवकरच नवीन अध्यक्षाची घोषणा होण्याची शक्यता आहे, आणि त्यावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या महत्त्वाच्या पदासाठी अनेक इच्छुक असल्याने पक्षात गटांतर्गत तणाव आहे. नाराज गटांचे समाधान करून संघटनात्मक समन्वय साधणे हे भाजपपुढील मोठे आव्हान ठरणार आहे. मात्र केंद्रीय नेतृत्व लवकरच निर्णय घेईल, अशी शक्यता आहे.