फोटो सौजन्य- pinterest
अपरा एकादशी ही हिंदू धर्मातील महत्त्वाची एकादशी मानली जाते. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते. अपरा म्हणजे अपार पुण्य देणारी अशी मान्यता आहे. या दिवशी उपवास जप, दान आणि भक्ती केल्याने पापांचा नाश होऊन पुण्य प्राप्त होते, असे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले जाते. अपरा एकादशीची कथा प्राचीन पुराणात देखील सांगितली जाते.
या कथेनुसार एकादशीचे व्रत केल्यामुळे मोठ मोठे पापेही नष्ट होतात आणि भगवान विष्णूंची कृपाही प्राप्त होते. प्राचीन काळी महीध्वज नावाचा एक सत्रवृत्तीचा राजा होता. तो प्रजेची सेवा करणारा आणि भगवान विष्णूंचा परमभक्त होता. पण त्याचा भाऊ वज्रध्वज अत्यंत मुत्सदी आणि क्रूर स्वभावाचा होता. भावाच्या कीर्तीमुळे तो सतत जळत असे. एके दिवशी व्रजध्वजाने कपाटाने महीध्वज वध केला आणि त्याचे शरीर जंगलात एका पिंपळाच्या झाडी खाली कोरून टाकले. अकाली मृत्यू आल्यामुळे महीध्वजाचा आत्मा इतरत्र भटकू लागली आणि त्या परिसरातील लोकांना त्रास देऊ लागली.
काही काळानंतर धौम्य ऋषी त्या जंगलातून जात होते. त्यांनी आपल्या तपशक्तीने हे कारण जाणले त्यांनी त्या भटकणाऱ्या आत्म्याच्या मुक्तीसाठी अपरा एकादशीचे व्रत केलं आणि त्याचे पुण्य महीध्वजाला अर्पण केले. त्या व्रताच्या प्रभावामुळे महीध्वजाला प्रेत योनीतून मुक्ती मिळाली आणि त्याला उत्तम लोभ प्राप्त झाले. तेव्हापासून अपरा एकादशीचे व्रत पापांचे नाश करणारे आणि मोक्ष देणारे मानले जाते.
अपरा एकादशीचे महत्त्व पुराणांमध्ये ही वर्णन केलेले आहे. या व्रताचे पुण्य तीर्थयात्रा, यज्ञ आणि नाना इतकेच मानले जाते. त्यामुळे अनेक भक्त या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करून उपवास करतात. या दिवशी विष्णू सहस्त्रनाम, भगवतगीता आणि विष्णू मंत्रांचे पठण करण्याला महत्त्व दिलं जातं.
तुळशी पूजन, अन्नदान आणि गरजूंना मदत करणे ही शुभ मानलं जातं. उपवासात साबुदाणा, भगर, दूध, फळे आणि शेंगदाण्याचे पदार्थ खाल्ले जातात तर तांदूळ, धान्य, कांदा आणि लसूण टाळले जातात. लोकश्रद्धेनुसार अपरा एकादशी मनशांती, सकारात्मकता आणि अध्यात्मक प्रगतीसाठी फारच उपयुक्त मानली जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी व्रत, जप आणि दान केल्याने पुण्यप्राप्ती होते आणि जीवनातील नकारात्मकता दूर होते.
Ans: उपवास करणे, विष्णू पूजन, मंत्रजप, तुळशी पूजन, दानधर्म
Ans: उपवासामुळे मन आणि शरीर शुद्ध राहते तसेच आत्मिक शांती मिळते, असे मानले जाते.






