प्रचीन काळातील हिंदू विवाह पद्धीतीचे काही पुरातन अवशेष सापडलेले आहेत. त्यानुसार तेव्हाच्या लग्नपद्धतींचा अंदाज लावता येतो. याबाबतची सविस्तर माहिती आर्यभूमी या इन्स्टाग्रामवरुन देण्यात आली आहे. चंद्रकेतुगढच्या मातीकामावर उभ्या असलेल्या या अद्भुत शिल्पात सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा एक भारतीय विवाह जिवंत होतो. हे भारतातील सर्वात प्राचीन विवाह-दृश्यांपैकी एक आहे.
प्राचीन काळातील शिल्प सापडले त्यानुसार, एका भागात स्त्रिया वर्तुळात उभ्या आहेत आणि मध्यभागी बसलेल्या वधूसमोर हळदीचा सोहळा घडतो आहे. शिल्पातील कोरीवकामातून स्पष्ट दिसून येतं की, काही आकृत्या अशा आहेत ज्या, आताच्या हळदी समारंभाशी मिळत्या जुळत्या आहेत. स्त्रियांच्या हातातील वाट्या, उभ्या आकृत्यांतील हालचाल, आणि त्या क्षणाची सामूहिक ऊर्जा सगळं काही या सोहळ्याच्या पवित्रतेची जाणीव करून देतं.
पालखी समारंभ !
याच कोरीवकामाबरोबर आणखी एक शिल्प दिसून आलं ते म्हणजे, वधूची माहेरून पाठवणी कराताना असलेल्या पालखीची.
चार ते सहा पुरुष खांद्यावर दांडका धरून पालखी पुढे नेत आहेत. आत बसलेली स्त्री अत्यंत शांत मुद्रेत दिसते. हे शिल्प आताच्या विवाहसंस्कृतीतील वधूच्या पालखीसारखा दिसतो. ही पालखीच्या कोरीवकामावर प्राणी चित्र प्रवासाच्या मंगलतेची खूण बनतं. हे दृश्य सांगतं की विवाह हा केवळ घरातील मुद्दा नव्हता तो एक संपूर्ण समुदायाच्या सहभागाने साजरा होणारा उत्सव होता.
हिंदू विवाहसंस्कृतीत सात फेरे घेताता वधू आणि वर एकमेकांना वचनं देतात. त्यावेळी अग्नीदेवतेला साक्ष ठेवली जाते. याला मिळती जुळती शिल्प देखील सापडली. अग्नी कुंडात आहुती देण्याचा तो क्षण इतका बारकाईने दाखवला आहे की आजही लग्नात हा विधी पाहताना दिसणारी तीच भावस्पंदने इथे जाणवतात. दोन हजार वर्षांपूर्वीचा हा लाजाहोम हिंदू विवाहाच्या अखेरच्या, सर्वात पवित्र विधीचे दर्शन घडवतो.
या पात्रातील प्रत्येक स्तर एक कथा सांगतो स्त्रियांचे आभूषण, पुरुषांचे वस्त्र, संगीत, नृत्य, अन्नपदार्थ, उत्सवातील चैतन्य. हा वाडगा केवळ मातीचा नाही; एक संपूर्ण संस्कृतीने आपल्या स्मृती इथे कोरून ठेवल्या आहेत. आजचा भारतीय विवाह कितीही आधुनिक झाला तरी त्याची मूळ धडधड इथेच आहे चंद्रकेतुगढच्या या मूक पण जिवंत साक्षीत आहे. हळद, पालखी, आणि लाजाहोम आपण आजही करतो ते सगळं इथे दोन हजार वर्षांपूर्वीच्या शिल्पावर आहे. या सुंदर कथनात भारतीय विवाहाची सातत्यता, त्याची भावना, आणि त्याची परंपरा काळाला हरवून पुढे चालत राहिली आहे. हे शिल्प सांगतं की आपली संस्कृती केवळ टिकून नाही, तर प्रत्येक पिढीसोबत नव्यानं जिवंत होत राहिली आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






