Lajja Gauri : चेहरा नाही, तरी होते देवीची पूजा; कोण आहे लज्जा गौरी? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इतिहासातील पुराण कथांनुसार, लज्जा गौरी ही सृजन, मातृत्व आणि समृद्धीचं प्रतीक मानली जाते. देवीला मूर्तींमध्ये बसवलेल्या अवस्थेत दाखवले जाते. पण इतर देवी-देवतांप्रमाणे या देवीला मुखं नसतं. तर त्याजागी कमळ दाखवलं जाते. यामुळे या देवीला कमळमुखी देवी देखील म्हटले जाते.
लज्जा या शब्दाच अर्थ लाज किंवा संकोच असा होता. पण देवीच्या संदर्भात हा अर्थ वेगळा मानला जातो. प्राचीन परंपरेनुसार, जीवनाची निर्मिती निर्सगशक्ती आणि स्त्रीशक्ती यांचे प्रतीक म्हणून लज्जा देवीला ओळखले जाते. लज्जा गौरीला आदिशक्तीचं प्रतीकही मानले जाते.
संतानप्राप्ती, सुखी संसार, भरघोस पीक आणि समृद्धीसाठी लोक लज्जा देवीकडे प्रार्थना करताता. सध्या काळ बदलला आहे, मंदिराची रचानाही बदलली आहे. पण लज्जा गौरीच्या चेहऱ्यामागचं गूढ कायम आहे. ही देवी भारतीय संस्कृतीत स्त्रीशक्तीचे, मातृत्व आणि जीवननिर्मितीचे वेगळं प्रतीक म्हणून ओळखली जाते.
पुरातत्त्व संशोधकांच्या मते, लज्जा गौरीची पंरपरा हजारो वर्षांपूर्वीची आहे. काही संशोधक देवीचा संबंध सिंधू संस्कृतीती मातृदेवतेशी जोडताता. संशोधकांच्या माहितीनुसार, या चालुक्य, राष्ट्रकूळ काळात या देवीच्या मूर्ती मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात आल्या होत्या. सध्या या कर्नाटकच्या बादामी आणि आंध्र प्रदेशातील काही ठिकाणी दुर्मिळ प्रमाणात आढळतात. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये लज्जा गौरीची पूजा आजही केली जाते.
हे देखील वाचा : Rahu Ketu Impact at Home: जेव्हा घरावर पडते ‘काळ्या जादू’ची सावली, राहू – केतूचा प्रभाव कसा समजावा, काय आहे तथ्य






