१० मिनिटांमध्ये बनवा खमंग आणि कुरकुरीत शेवगा फ्राय, गरमागरम भातासोबत लगेच चविष्ट पदार्थ
शेवग्याच्या शेंगा शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. यामध्ये असलेले गुणकारी घटक हाडे, केस, त्वचा आणि संपूर्ण शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात. शेवग्याच्या शेंगांचा वापर करून विविध चविष्ट पदार्थ बनवले जातात. शेंगांची भाजी, आमटी तर काहीवेळा शेंगांचा वापर करून सूप सुद्धा बनवले जाते. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा आहारात शेवग्याच्या शेंगांचे सेवन करावे. यामुळे आरोग्य सुधारते आणि शरीराला ऊर्जा मिळते. वारंवार वाढलेल्या आजारापामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाली असेल तर आहारात शेवग्याच्या शेंगांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये शेवग्याच्या कुरकुरीत शेंगा फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या शेंगा फ्राय घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडतील आणि चव सुद्धा चांगली लागेल. जेवणाच्या ताटात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. अशावेळी झटपट तुम्ही शेंगा फ्राय बनवू शकता. गरमागरम डाळ भातासोबतच शेवगा फ्राय अतिशय सुंदर लागेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Dhokla Recipe: घरच्या घरी झटपट बनवा मऊ-स्पॉंजी ढोकळा; फॉलो करा ‘ही’ ट्रिक, वाचा सोपी रेसिपी






