Dinvishesh : मराठी साहित्यातील श्रेष्ठ कथाकार आणि कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांची जयंती; जाणून घ्या ०६ जुलैचा इतिहास(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Dinvishesh : मराठी साहित्यातील श्रेष्ठ कथाकार आणि कादंबरीकारांपैकी एक म्हणजे व्यंकटेश माडगूळकर. ०६ जुलै १९२७ रोजी त्यांचा सांगलीच्या माडगूळ येथे जन्म झाला होता. त्यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षीच साहित्यलेखनाला सुरुवात केली होती. त्यांनी बनगवाडी, वावटळ, पुढचं पाऊल, कोवळे दिवस, करुणाकष्ट आणि सत्तांतर अशा उल्लेखनीय कादंबऱ्यांमधून ग्रामीण जीवनाचे वास्तव मांडले. त्यांनी सुमारे १९५० च्या दशकात मुंबईत आल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीत पटकथालेखनाची सुरुवात केली. त्यांनी अनेक कथासंग्रह देखील लिहिले आहेत. त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, जर्मन, जपान आणि रशियन अशा विविध भाषांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.
06 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
06 जुलै रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






