RSS चे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
देशातील राजकारणामध्ये सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव घेतले जाते. भाजपची मातृसंस्था म्हणून आरएसएसची ओळख आहे. 100 वर्षांची संस्था असलेल्या संघाची सुरुवात डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी केली आहे. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करुन नवीन अध्यायाची सुरुवात केली. 1889 मध्ये 01 एप्रिल रोजी केशव हेडगेवार यांचा जन्म झाला. आज त्यांची 136 वी जयंती आहे.
हिंदूत्ववादी विचारवंत असलेल्या डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 मध्ये विजयादशमीच्या दिवशी आरएसएसची स्थापन केली. त्यांच्या या संस्थेने भारतीय राजकारणावर मोठा परिणाम केला आहे. नागपूरमधून सुरु झालेल्या त्यांच्या या कार्याने आता देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कार्य केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचणयासाठी क्लिक करा