लठ्ठपणामुळे अनेक व्यक्तींना महिलांना विशेषतः मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो लठ्ठपणा हा आता एक आजार असेच मानले जाते. शरीरावर जास्त चरबी जमा झाल्यामुळे एक जुना आणि गुंतागुंतीचा आजार असा सर्वांचा समज आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारांचा संबंध जोडला जातो यामध्ये मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, हायपरटेन्शन, हायपोथायरॉईडीझम, इतर अनेक आजार आणि अगदी कर्करोगासारख्या अशा मोठ्या आजारांचा समावेश आहे. लठ्ठपणाला त्रासून अनेक जण जिम, योगा क्लासेस, झुम्बा डान्स क्लासेस यामध्ये पैसे खर्च करतात.
लठ्ठपणाचा हा त्रास विशेषतः महिलांना जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. महिलांना हार्मोनल असंतुलन, पीसीओडी, वंध्यत्व आणि इतर अनेक आजारांनी देखील लठ्ठपणामुळे ग्रासले जाते. डॉक्टर वर्षा आशिष डहाणे यांनी व्हायब्रेट विदर्भ यांच्या सोबत संवाद साधला. यामध्ये त्यांनी सांगितले की जवळजवळ 45 टक्के लोकांना या संदर्भात माहिती असली तरी उर्वरित लोकांना लठ्ठपणा या आजारापासून सावध राहणे गरजेचे आहे. कारण आता आपला देश हा साखरेची राजधानी झाला आहे. कारण देश हा आता लठ्ठपणाची राजधानी होण्याकडे वळला आहे असे ओबेसिटी एक्सपर्ट डॉ. वर्षा आशिष डहाणे यांनी सांगितले.
डॉ. डहाणे म्हणाल्या की, लठ्ठपणा येण्याचे मुख्य कारण म्हणजेच तणावपूर्ण जीवनशैली. तणावामुळे शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाच्या हार्मोन्सचे उत्पादन वाढत जाते त्यामुळे भूकही आपली वाढते आणि शरीरामध्ये चरबी जमा होते. आपली भूक वाढल्यामुळे कॅलरीचे सेवन आणि वजन वाढण्याचा धोका देखील वाढत जातो. जेव्हा आपला तणाव वाढतो किंवा आपण तणावाच्या स्थितीत असतो तेव्हा आपल्या शरीरामधील कॉर्टिसोल हार्मोनची पातळी देखील वाढते, त्यामुळे व्यक्तीमध्ये जास्त खाण्याची इच्छा जागृत होते.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटीन सॅलड, नोट करून घ्या रेसिपी
डॉ. डहाणे पुढे म्हणाल्या की, झोपेमध्ये अडचण आणि अन्नाचे पचन होण्यावर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे आपल्या पोटातील चरबी आणि शरीराचे वजन वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्याव्यतिरिक्त धकाधकीचे जीवन तणाव त्याचबरोबर कामांमधील ताण ही देखील त्याची कारणे असू शकतात. डॉ डहाणे यांच्याकडे फक्त विदर्भामधूनच नाही तर पुणे मुंबई हैदराबाद आणि विदेशामधून देखील रुग्णून ऑनलाईन त्यांच्याकडून सल्ला घेत असतात.
अबॅसिटी एक्सपर्ट डॉ वर्षा डहाणे म्हणाले की, अत्याधुनिक इन बॉडी टेस्ट मशीनच्या मदतीने रुग्णांच्या लठ्ठपणाचे विश्लेषण करता येते. त्याचबरोबर स्नायू आणि चरबीचे विश्लेषण, कमरेचा घेर, चयापचय दर, बॉडी मास इंडेक्स आणि वैद्यकीय इतिहासाच्या आधारे वर्गीकरण केल्यानंतर उपचार सुरू केले जातात. त्यांनी सांगितले की रुग्णांवर उपचार करण्याची त्यांची स्वतःची पद्धत आहे, यामध्ये ते आहारामध्येच साखर, तूप, रोटी, चिकन, केळी किंवा मांसाहारी पदार्थ घेणे थांबवत नाहीत. त्याचबरोबर रुग्णांच्या वैद्यकीय इतिहासावर आणि रक्त अहवालावर आधारित वैयक्तिकृत आहाराचा आराखडा आखून देतात आणि विविध तंत्रज्ञानचा वापर करून चरबी कमी होणे, त्याचबरोबर त्वचा घट्ट होणे आणि स्नायूंचे बळकटीकरण करणे या संदर्भात उपाय योजना केल्या जातात. उपचारांमध्ये मल्टी विटामिन आयव्ही ड्रीप थेरपी देखील वापरली जाते. एवढेच नव्हे तर त्या रुग्णांना सकारात्मक विचारसरणीचे प्रशिक्षण देखील देतात जेणेकरून रुग्ण आहेत त्यांना मुक्त जीवनशैली व्यवस्थापन करू शकतात.
आतापर्यंत डॉक्टर डहाणे यांच्यावर उपचार करणाऱ्या रुग्णांनी विश्वास ठेवला आहे की वजन वाढणे असो किंवा कमी होणे त्यांनी आरोग्यदायी पद्धतींचा अवलंब केला आहे. त्याचबरोबर आपण बागेमध्ये किंवा शेतामध्ये व्यायाम केले पाहिजे असे बांधिल काहीच नाही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कामामधूनही आपण व्यायाम करू शकतो. प्रत्येक 20 किलो वजनासाठी एक लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपण संपूर्ण कुटुंबासह घरातील बनवलेले जेवण पौष्टिक अन्न खाण्याचा नियम बनवला पाहिजे. सहा ते सात तास झोप घेणे हे फार गरजेचे आहे जर आपण खाण्यापिण्यासाठी आणि झोपण्यासाठी वेळ दिला नाही तर आपण मोठे जनावर आपल्याला आजार होण्याची शक्यता आहे आणि औषध घेण्यासाठी वेळ काढावा लागेल यावर त्यांनी भर दिला पाहिजे.